Monday, February 2, 2026
Home ताज्या बातम्या विद्यार्थीनींच्या सक्षमीकरणासाठी पोलीस आपल्या सोबत – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे सुरक्षित...

विद्यार्थीनींच्या सक्षमीकरणासाठी पोलीस आपल्या सोबत – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे सुरक्षित जीवन, सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया इत्यादींचे धोके व फसवणुकी बाबत मार्गदर्शन

0
2

जामखेड न्युज—–

विद्यार्थीनींच्या सक्षमीकरणासाठी पोलीस आपल्या सोबत – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

सुरक्षित जीवन, सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया इत्यादींचे धोके व फसवणुकी बाबत मार्गदर्शन

 

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित ‘ एक संवाद विद्यार्थीनींसाठी ‘ पोलीस दलाचा अभिनव उपक्रम जामखेड येथील ल ना होशिंग माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात वार शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा मा. सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी मा. श्री मिलिंद पोक्षे साहेब होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत केले. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय सोमनाथजी घार्गे साहेब यांच्या संकल्पनेतून खास विद्यार्थिनींसाठी आयोजित मार्गदर्शनाबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त केले.

कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मिलिंद पोक्षे यांनी जवळ जवळ दीड तास विद्यार्थीनीं बरोबर खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. महाराष्ट्रात पोक्षे यांनी 24 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत अकराशे पेक्षा जास्त व्याख्याने देऊन विद्यार्थीनींमध्ये प्रबोधन करण्याचे महान कार्य केलेले आहे.

ल ना होशिंग विद्यालयाच्या भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम सभागृहात इयत्ता आठवी, नववी आणि दहावीतील 450 पेक्षा जास्त विद्यार्थीनी कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. पोक्षे यांनी विद्यार्थीनींसाठी आत्मनिर्भरता, सुरक्षित जीवन, सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया इत्यादींचे धोके व फसवणुकी बाबत उदाहरणाच्या माध्यमातून मुलींनी कशी काळजी घ्यावी व भविष्यात कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्यासाठी कसे सजग राहावे यांचे मार्गदर्शन केले.

आपल्या समस्या, अडचणी, निकटवर्तीय लोकांकडून होणारा त्रास, मनमोकळेपणाने सांगून त्वरित संबंधित पोलीस विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. पोक्षे साहेब यांच्या व्याख्यानामुळे भविष्यात मुलींना येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना व आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून कसे यशस्वी व्हावे. यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली विद्य प्राप्त झाली. मार्गदर्शनात ऐकलेले सर्व विचार आपली आई, बहीण, शेजारी महिला यांना देखील सांगण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ प्रांजलताई चिंतामणी यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांचे व पोक्षे साहेब त्यांच्यासोबत आलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रभावती कोकाटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल किरण ठुबे आणि सर्व टीमचे आभार मानले. शालेय विद्यार्थीनींसाठी एक संवाद या पोलीस दलाच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व भविष्यात असे कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पी आय दशरथ चौधरी साहेब आणि गुप्तचर विभागाचे श्री जाधव साहेब आवर्जून उपस्थित होते. त्याचबरोबर
ल ना होशिंग माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, कार्यालयीन प्रमुख ईश्वर कोळी, कैलास वराट, नरेंद्र डहाळे , उमाकांत कुलकर्णी , साईप्रसाद भोसले व विद्यालयातील महिला अध्यापिका शिक्षिका प्रतिनिधी सुप्रिया घायतडक,संगीता दराडे, वंदना आल्हाट, पूजा भालेराव, स्वप्नाली घाडगे, रेश्मा कारंडे, प्रियंका सुपेकर, स्वाती हांगे, प्रभा आखाडे, शितल जगदाळे, स्वाती गिरी, मोहिनी जाधव सर्व महिला अध्यापिका व नगरसेविका होळकर ताई उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक व एन सी सी विभागाचे प्रमुख अनिल देडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कला अध्यापक मुकुंद राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!