जामखेड न्युज——
साकत घाटात एकाच दिवशी दोन ऊसाचे ट्रक पलटी
बांधकाम विभागाने ठेकेदारावर कारवाई करावी तसेच दर्जेदार काम न झाल्यास बांधकाम विभागाला टाळे ठोकणार
जामखेड साकत रस्त्याची खुपच दुरावस्था झालेली होती. रस्त्यावर खड्डेच खड्डे होते. सावरगाव फाटा ते पाटोदा सरहद्द पर्यंत खड्डे बुजवणे डागडुजी करण्याचे काम झाले पण काम खुपच थातूरमातूर निकृष्ट दर्जाचे झाले. तसेच अनेक ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे काम तसेच ठेवले ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे आठच दिवसांत रस्ता परत खड्डे मय झाला आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागते. अर्धवट खड्डे बुजवून काम ठप्प झाले आहे. नेहमीच अपघात घडत आहेत. घाटात तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. यातच घाटातील खड्ड्यामुळे नेहमीच अपघात होत आहेत. घाटात वळणावर खड्ड्यामुळे ऊसाचा ट्रॅक्टर पलटी झाला. एकाच दिवसात दोन ऊसाचे ट्रक पलटी झाले आहेत. ताबडतोब बांधकाम विभागाने ठेकेदारावर कारवाई करावी तसेच दर्जेदार काम न झाल्यास बांधकाम विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा दिलेल्या निवेदनात दिला आहे.

सध्या या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक होत आहे. पण रस्त्यावरील खड्ड्यामुळे ऊसाच्या गाड्या पलटी होत आहे. तसेच हार्वेस्टिंग च्या साहाय्याने ऊस तोडणी करून ऊसाचे तुकडे करून गाड्या या मार्गाने जातात पण खड्ड्यामुळे गाड्या जास्त हालतात आणि ऊसाचे तुकडे वाहनचालकांच्या अंगावर पडतात यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. लवकरात लवकर सर्व खड्डे चांगल्या प्रकारे बुजवावेत अशी मागणी होत आहे.

जामखेड साकत रस्ता म्हणजे सध्या असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली होती रस्त्यावर मोठ मोठे खड्डे होते. रस्त्याची चाळणी झाली होती. वाहने खिळखिळी तर वाहनचालकांचे मनके खिळखिळी होत होते. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे टेन्डर निघाले ज्या ठेकेदाराने काम घेतले त्यांने खुपच निकृष्ट दर्जाचे काम केले. तसेच अनेक ठिकाणी अर्धवट काम केले. त्यामुळे आठच दिवसांत परत जैसे थे परिस्थिती झाली आहे.

ताबडतोब रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी आण्णासाहेब मुरूमकर यांनी केलेली आहे. नियमानुसार इस्टीमेट नुसार काम होणे आवश्यक आहे पण तसे होत नाही यामुळे आठ दिवसात खड्डे पडत आहेत. यातच निकृष्ट कामाचा नमुना समोर येत आहे.
ठेकेदाराची मनमानी दिसून येत आहे. बांधकाम विभागाने ताबडतोब निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मुरूमकर यांनी केली आहे.












