जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट) –
वृक्षलागवड हा निवळ एक शासकीय उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी, याच गोष्टीचे उद्दिष्ट समोर ठेवून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी नान्नज दुरक्षेत्राच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडे, हेड कॉन्स्टेबल विजय सुपेकर, नवनाथ रोकडे, भगवान पालवे, विजय कोळी, माजी सभापती सुभाष आव्हाड, सरपंच महेंद्र मोहळकर उपसरपंच संजय साठे, वाघा येथील सरपंच शामराव बारस्कर, भाजपा युवा नेते उदय पवार, ग्रा. स. सदस्य लियाकत शेख, डी. डी. मोहळकर, संतोष मोहळकर, आप्पा मोहळकर, चेअरमन जालिंदर चव्हाण, हनुमंत ढाळे, सुवर्णकार धनु लगस मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरपंच महेंद्र मोहळकर यांच्या मार्फत वृक्षारोपण करण्यासाठी रोपे देण्यात आली. तर वाघा गावचे सरपंच शामराव बारस्कार यांच्याकडून सदर रोपांना पाणी देण्यासाठी ड्रीप ची व्यवस्था करण्यात आली. झाडांची नुसती लागवडच नाहीतर त्याला जोपासण्याची संपूर्ण जबाबदारी आमची राहील असे आश्वासन पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य लियाकत शेख यांनी सांगितले.
या वेळी आपल्याला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू नये, किंवा त्याचा जास्त दुष्परिणाम होऊ नये म्हणून शासनाने घालून दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत असेही आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.






