Tuesday, March 3, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड साकत रस्त्यावरील खड्डे आठच दिवसांत परत जैसे थे!! ठेकेदाराच्या निकृष्ट...

जामखेड साकत रस्त्यावरील खड्डे आठच दिवसांत परत जैसे थे!! ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे वाहनचालकांना त्रास, बांधकाम विभागाने ठेकेदारावर कारवाई करावी

0
615

जामखेड न्युज——

जामखेड साकत रस्त्यावरील खड्डे आठच दिवसांत परत जैसे थे!!

ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे वाहनचालकांना त्रास, बांधकाम विभागाने ठेकेदारावर कारवाई करावी

जामखेड साकत रस्त्याची खुपच दुरावस्था झालेली होती. रस्त्यावर खड्डेच खड्डे होते. सावरगाव फाटा ते पाटोदा सरहद्द पर्यंत खड्डे बुजवणे डागडुजी करण्याचे काम झाले पण काम खुपच थातूरमातूर निकृष्ट दर्जाचे झाले. तसेच अनेक ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे काम तसेच ठेवले ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे आठच दिवसांत रस्ता परत खड्डे मय झाला आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागते. अर्धवट खड्डे बुजवून काम ठप्प झाले आहे. नियमानुसार इस्टीमेट नुसार काम झाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा गावातील ग्रामस्थ आण्णासाहेब मुरूमकर यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिला आहे.

जामखेड साकत रस्ता म्हणजे सध्या असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली होती रस्त्यावर मोठ मोठे खड्डे होते. रस्त्याची चाळणी झाली होती. वाहने खिळखिळी तर वाहनचालकांचे मनके खिळखिळी होत होते. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे टेन्डर निघाले ज्या ठेकेदाराने काम घेतले त्यांने खुपच निकृष्ट दर्जाचे काम केले. तसेच अनेक ठिकाणी अर्धवट काम केले. त्यामुळे आठच दिवसांत परत जैसे थे परिस्थिती झाली आहे.

ताबडतोब रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी आण्णासाहेब मुरूमकर यांनी केलेली आहे. नियमानुसार इस्टीमेट नुसार काम होणे आवश्यक आहे पण तसे होत नाही यामुळे आठ दिवसात खड्डे पडत आहेत. यातच निकृष्ट कामाचा नमुना समोर येत आहे.

ठेकेदाराची मनमानी दिसून येत आहे. बांधकाम विभागाने ताबडतोब निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मुरूमकर यांनी केली आहे.

आण्णासाहेब मुरूमकर यांनी म्हटले आहे की, इस्टीमेट नुसार काम करावे सर्व प्रकारची वेगवेगळ्या एमएम मध्ये खडी, योग्य डांबर, रोलिंग, रस्ता झाडण्यासाठी स्प्रे करणे असे सर्व इस्टीमेट नुसार असावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा मुरूमकर यांनी दिला आहे. अनेक खड्डे तसेच ठेवले आहेत तसेच अनेक ठिकाणी बुजवलेले खड्डे पुन्हा चार दिवसांत जैसे थे झाले आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये – जा करतात. साकतचा घाट खुपच अरूंद आहे त्यामुळे वळणाचा नीट अंदाज येत नाही यातून नेहमीच अपघात होतात. आता तर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. नेहमीच अपघात होत आहेत.

सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग चे काम खुपच संथगती ने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात पण सौताडा घाटापेक्षा साकत घाट कठीण व अरूंद आहे यामुळे चालकाला अंदाज येत नाही यामुळे अपघात होतात. घाट रूंदीकरण करण्याची व खड्डे बुजविण्याची मागणी केली होती यानुसार खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे पण चांगल्या प्रकारे खड्डे बुजवले जात नाहीत.

एका वर्षात साकत घाटात पंधरा ते वीस अपघात झाले आहेत यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. यामुळे ताबडतोब घाटाचे रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे. तसेच सध्या खड्डे भुजवावेत अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!