गेल्या अडीच तीन वर्षापासून जामखेड सौताडा या राष्ट्रीय महामार्गचे काम सुरु असून मुख्य रस्ता असलेला खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल पर्यंतचा शहरातर्गत रस्त्याच्या कामाला गती मिळेना यासाठी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी जामखेड तहसील कार्यालयात सबंधित विभागाचे अधिकारी ठेकेदार यांना बोलावत कामाबाबत आढावा घेतला . यावेळी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकारी व ठेकेदार यांना देण्यात आल्या आहेत. जर रस्ता कामात कोणी अडथळा निर्माण करत असेल तर ठेकेदार यांनी पोलिस संरक्षण घेऊन अडथळा निर्माण करण्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
यावेळी तहसीलदार धनंजय बांगर , गटविकास अधिकारी शुभम जाधव, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, शशिकांत सुतार सार्वजनिक बांधकाम विभाग, रवींद्र घुले तालुका कृषी अधिकारी, दिलीप तिजोरे सहायक निबंधक जामखेड, महावितरणच्या चव्हाण सहा आदी अधिकारी उपस्थित होते.
अनेक महिन्यांपासून समर्थ हॉस्पीटल ते खर्डा चौक हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यासाठी ठेकेदार व अधिकारी यांची जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी झाडाझडती घेत हा रस्ता तत्काळ झाला पाहिजे अशा सूचना अधिकारी व ठेकेदार यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी रस्त्याबाबत कोण अडथळा निर्माण करत असेल तर त्यांना कायदेशीर कारवाई करा पण रस्त्याबाबत कोणताही निष्काळजी पणा चालणार नाही. त्यामुळे जामखेड सौताडा रस्ता बाबत जिल्हाधिकारी ॲक्शन मोड वर आल्याने जामखेड सौताडा रस्ता लवकर मार्गी लागणार का? हे पाहणे अस्तुक्याचे ठरणार आहे.
तसेच जिल्हाधिकारी यांनी जामखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी करत त्या ठेकेदार यांना लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जामखेड येथे ईव्हिएम मतदान स्टाँग रूम ची पाहणी करत तेथील सुरक्षिततेची पाहणी केली आहे. महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, महावितरण नगरपरिषद , सह विविध विभागांचा घेतला आढावा. 21 डिसेंबर रोजी निकाल असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत पोलिस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
चौकट
जिल्हाधिकारी यांनी जामखेड येथे विविध ठिकाणी भेटी
कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीस झिक्री ता. जामखेड येथील शेतकरी चंद्रकांत आजबे यांची फळबाग पाहणी केली. तसेच उपजिल्हा ग्रामिण रुग्णालय जामखेड येथे डॉ ए पी जे अब्दुल कलाम वाचनालय नगरपरीषद जामखेड भेट दिली तसेच नगरपरीषद जामखेड निवडणुकीचे ईव्हिएम स्ट्रॉग रुम भेट देऊन पाहणी केली. जामखेड – सौताडा महामार्ग बाबत बैठक तहसिल कार्यालय जामखेड उपस्थिती उपविभागीय अधिकारी कर्जत, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम. उपअधिक्षक भुमी अभिलेख, मुख्याधिकारी नगरपरीषद जामखेड व ठेकेदार यांची एकत्रित बैठक घेतली. तसेच जामखेड तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख यांची बैठक घेण्यात आली.
चौकट
किती जणांना अपंगत्व आणणार –
गेल्या अनेक महिन्यांपासून खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता हा खोदून ठेवला आहे त्यामुळे जामखेडकर या रस्त्यामुळे मरण यातना भोगत आहेत. त्यामुळे हा रस्ता सुरू झाल्यापासून अनेक जणांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे हा रस्ता कधी होणार आहे असा सवाल जामखेड कर विचारत आहेत. अधिकारी व ठेकेदार यांना आजुन किती जणांना अपंगत्व आणणार आहेत हे पाहणे अस्तुक्याचे ठरणार आहे.