सुर्यकांत मोरेवर फौजदारी गुन्हा दाखल

0
3727

जामखेड न्युज——

सुर्यकांत मोरेवर फौजदारी गुन्हा दाखल

नगरपरिषद निवडणूक प्रचार सभेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर भाषणात विधानपरिषद सभागृहाबद्दल अवमानकारक वक्तव्य आता अंगलट आले आहे. विधानपरीषद सदस्य श्री. श्रीकांत भारतीय व श्री.प्रविण दरेकर यांनी विशेष अधिकार भंग व अवमान कारक वक्तव्य बद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांनी चौकशी व गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीसांना दिले होते यानुसार सुर्यकांत ऊर्फ नाना हौसराव मोरे रा. रत्नापुर, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) यांचे विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.

विधानपरिषद सभागृहाबद्दल अवमानकारक वक्तव्यामुळे सभागृह सदस्यांचे पत्र प्राप्त झाल्याने दिनांक 23/11/2025 रोजी संध्याकाळी 07/00 ते 07/30 वाजेच्या दरम्यान जुने तहसिल कार्यालय जामखेड समोर जामखेड नगरपरीषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) यांच्या प्रचार सभेत श्री.सुर्यकांत ऊर्फ नाना हौसराव मोरे रा.रत्नापुर, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांनी विधानपरीषद सदस्य यांचे विधानपरीषेदेशी संबधीत कर्तव्याबद्दल व कामकाजबद्दल, विधानपरीषद सभाग्रहाचे रचनेबद्दल, विधानपरीषद सभाग्रहात कार्यरत असलेल्या सर्वच सन्माननीय सदस्याबद्दल व मा.सभापती यांचे बाबत तसेच विधानपरीषद सभाग्रहाच्या कायदा निर्मितेच्या प्रक्रीयेमधील सभाग्रहाच्या अधिकारीते बद्दल व एकुण विधान परीषद सभागृह या घटनात्मक संस्थेबद्दल अत्यंत अक्षेपार्ह निंदनीय, अवमानकारक वक्तव्य जाहिरपणे केलेले आहे.

श्री. सुर्यकांत ऊर्फ नाना हौसराव मोरे यांनी मा. विधानपरीषद सदस्य व मा. विधानपरीषद सभापती यांचे लौकिकास बाधा यावी या उद्देशानेच व त्यांना त्यांची पुर्ण कल्पना व जाणीव असताना जाहिरपणे अरोपयुक्त वक्तव्य करुन विधानपरीषद सभागृहाचे मा.सन्माननीय सदस्य व मा. सभापती यांचे लौकीकास बाधा आणुण विधानपरीषद सभागृहाचे सन्माननीय सदस्य व मा. सभापती अशा व्यक्तीबद्दल आक्षेपार्ह विधाने करुन त्याद्वारे विधानपरीषद या घटनात्मक संस्थेचा व संस्थेचे सन्माननीय सदस्य व मा. सभापती यांचे लौकीकास बाधा आणुन आब्रु नुकसानी केलेली आहे.

करीता आरोपी नामे सुर्यकांत ऊर्फ नाना हौसराव मोरे रा. रत्नापुर, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांचे विरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 चेकलम 356(1) व 356(2) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.

सदरचे प्रकरणात विधानमंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणीनमुद विशेष अधिकार भंग व अवमानाचे प्रकरणी सर्वकष चर्चा होवून त्यांचेकडील निर्देशानुसार आज रोजी फिर्याद दिलेली आहे.वगैरे मजकुरचे लेखी पत्रावरुन अदखलपात्र गुन्हा रजिष्टरी दाखल केला आहे. पुढील तपास पोसई कन्हेरे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here