तालुक्यात युरिया खताचा तुटवडा नाही – कृषी अधिकारी पाचारणे
जामखेड तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खत काही दुकान दार देत नाहीत अशा तक्रारी काही शेतकऱ्यांनी केल्या होत्या पण तालुक्यात युरिया खत उपलब्ध आहे तसेच दहा दिवसांत मोठ्या प्रमाणावर खत उपलब्ध होणार आहे कसलीही टंचाई नाही असे कृषी अधिकारी एस. पी. पाचारणे मॅडम यांनी सांगितले.
सध्या तालुक्यात एकूण 55 कृषि सेवा केंद्रामध्ये मिळून एकूण 466 टन युरिया खत उपलब्ध आहे. युरिया खत इतर खतांच्या तुलनेने स्वस्थ असल्याने पुरवठ्याच्या तुलनेत मागणी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काही ठिकाणी युरियाचा तुटवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांनी युरियासोबतच इतर खतांचा वापर करणे आवश्यक आहे.
पुढील 10 दिवसात जिल्हास्तरावरून युरिया खताचे आवटण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर युरिया खताची टंचाई बऱ्याच प्रमाणात दूर होईल.
तसेच खताच्या उपलब्धतेबाबत जिल्हा कृषि विकास अधिकारी यांचेमार्फत शेतकऱ्यां करिता ब्लॉगस्पॉट करण्यात आला असून त्यावर युरिया खत उपलब्धतेची माहिती दैनंदिन कृषि सेवा केंद्र निहाय उपलब्ध आहे.
रासायनिक खत उपलब्धता माहिती जिल्हा परिषद अहिल्यानगर
click the link to see the fertilizer availability in the Ahilyanagar District. https://adonagarzp.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding.html