राजस्थान येथील बनावट सोने विक्री करणारी टोळी सापळा लावून जामखेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी करत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. यामुळे जामखेड पोलीसांच्या कामगिरी चे कौतुक होत आहे. गणेश महादेव खेत्रे यांच्या फिर्यादी वरून आरोपी अशोक मिस्त्री, प्रविणकुमार मोहनलाल बागरी, मोहनलाल बालाजी बागरी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, दि. २८/११ / २०२५ रोजी जामखेड शहरातील प्रसिध्द कापड दुकानदार गणेश महादेव खेत्रे रा. जामखेड यांना त्यांचे कापड दुकानामध्ये अशोक मिस्त्री ( उत्तम कुमार मोकाराम बागरी) वय २४ वर्षे रा. धानसा ता. भिनमाल राज्य राजस्थान याने त्याचे सोबत असलेला आरोपी नामे मोहनलाल बालाजी बागरी वय ५६ वर्षे रा. धानसा ता.मिनमाल राज्य राजस्थान यांनी फिर्यादी यांचे क्रिएटीव्ह मेन्स वेअर नावाचे कापड दुकाणात येवून काही कपडे खरेदी करून एका पिवळया धातूच्या माळेतील एक मनी फिर्यादी यांना देवून सांगितले की, नाशिक या ठिकाणी खोदकाम करताना हे आम्हाला मिळून आले आहे. तुम्ही सोनाराकडे जावून हे सोने आहे का याची खात्री करा व आम्हाला पैशाची गरज असल्याने ८,००,०००/- रुपयामध्ये आमच्याकडील सर्व माल विकत घ्या. आरोपी वेळोवेळी त्यांच्या कडील बनावट सोने फिर्यादी यांना विकण्यासाठी फिर्यादीचे मोबाईलवर आरोपीकडील मोबाईलवरून संपर्क करत होते.
गुन्हयातील आरोपींनी दिनांक १५/१२/२०२५ रोजी दुपारी ०२.४५ वा. जामखेड कडून खर्डाकडे जाणारे रोडवरून रंगोली हॉटेलच्या जवळ थांबून फिर्यादीस ठरलेली रक्कम घेवून बोलावले होते. सदर बनावट सोन्याची जामखेड पोलीस स्टेशन हददीत विक्री करून फसवणूक होणार असल्याची माहीती गुप्त बातमी दारामार्फत जामखेड पोलीसांना मिळाली होती.
मिळालेल्या बातमीनुसार गुन्हा घडण्यापुर्वीच पोलीस निरीक्षक यांचे आदेशान्वये जामखेड पोलीस स्टेशन येथील पोलीस पथक खर्डा रोड परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्याचवेळी हॉटेल रंगोली याठिकाणी फिर्यादी, त्यांचा भाऊ व मित्र असे चारचाकी वाहनातून गेल्यानंतर आरोपींनी फिर्यादीस त्यांचेकडील बनावट सोने देवून, पैशाची मागणी केली त्याचवेळी फिर्यादी यांनी हे सोने नसून बनावट सोन्याचे दागिणे आहेत.
१) अशोक मिस्त्री(उत्तमकुमार मोकाराम बागरी) वय २४ वर्षे रा. धानसा ता.मिनमाल राज्य राजस्थान २ ) प्रविणकुमार मोहनलालबागरी वय २५ वर्षे रा. भिनमाल राज्य राजस्थान यांनी फिर्यादीस मारहान करून त्यांचे खिशातील रोख रक्कम३,००० /- रूपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याठिकाणी गोंधळ व आरडा ओरड झाल्याचे लक्षात येताच खर्डारोडवर सापळा रचून पेट्रोलिंग करत असलेले जामखेड पोलीस स्टेशन येथील पोना वाघ, पोकों पळसे, पोकॉघोळवे व पोकों शेवाळे अशांनी तात्काळ आरोपीस ताब्यात घेवून त्यांचेकडे घटनेच्या अनुशंगाने अधिकची विचारपूस केली असता. आरोपी यांनी सांगितले की, त्यांचे सोबत असलेला एक आरोपी हा खर्डा बसस्थानक याठिकाणी थांबला आहे. असे सांगितले तात्काळ जामखेड पोलीस स्टेशनच्या टिमने खर्डा याठिकाणी थांबलेला आरोपी क्रं. ३ मोहनलाल बालाजी बागरी वय ५६ वर्षे रा. धानसा ता. भिनमाल राज्य राजस्थान यास ताब्यात घेवून वरील आरोपी विरूध्द जामखेड पोलीस स्टेशनला फिर्यादी नामे गणेश महादेव खेत्रे वय३२ वर्षे धंदा कापडदुकाण रा. महादेवगल्ली, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा रजि.नं. ६६४ / २०२५ भा. न्या. सं. कलम ११९ ( ९ ), ३१८ (४), ३१८ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयातील आरोपींच्या अंगझडतीत फिर्यादीचे काढून घेतलेले रोख रक्कम ३०००/- रूपयेअंगझडती पंचनामा करून हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच आरोपीतांनी गुन्हयात वापरलेले पिवळया धातुच्या बनावट सोन्याच्या माळा अंदाजे वजन १ किलो ग्रॅम असा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचे आदेशान्वये पुढील तपास म. सपोनि वर्षा जाधव या करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अपर पोलीसअधीक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सपोनि वर्षा जाधव, पोसई संपत कन्हेरे, पोसई किशोर गावडे, पोहेकॉ प्रविण इंगळे, पोना रविंद्र बाघ, पोकों देविदास पळसे, पोकॉ कुलदिप घोळवे, पोकॉ आकाश शेवाळे, पोकॉ शशिकांत म्हस्के, तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोकों नितीन शिंदे, पोकों राहूल गुंडू यांनी केली आहे.