जामखेड नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग दोन व प्रभाग चार मध्ये होणार तिरंगी लढत
जामखेड नगरपरिषद निवडणूक न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवार दि. २ रोजी होणारी निवडणूक प्रभाग दोन ब व प्रभाग चार ब स्थगित करण्यात आली होती. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग चार मधील एका उमेदवारांने माघार घेतली त्यामुळे दोन्ही प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. उद्या चिन्ह वाटप होईल. २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग चार ब मधील फैमिदा कय्युमखान पठाण या उमेदवाराने माघार घेतली.
प्रभाग दोन ब मध्ये पुढील प्रमाणे उमेदवार आहेत. मराळ रेखा किरण राळेभात कमल महादेव राळेभात प्रिती प्रशांत अशी तिरंगी लढत होईल
प्रभाग चार ब मध्ये चिंतामणी प्रांजल अमित लोहकरे अमृता अमोल शेख नम्शा फहिमुद्दीन अशी तिरंगी लढत होणार आहे
उद्या गुरूवार दि ११ रोजी चिन्ह वाटप व २० डिसेंबर रोजी निवडणूक तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अशी माहिती मुख्याधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय साळवे यांनी दिली.
जामखेड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना छाननी दिवशी माजी नगराध्यक्षा अर्चना सोमनाथ राळेभात व भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांच्या सासुबाई अंजली अरूण चिंतामणी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. ते अर्ज 24 नोव्हेंबर रोजी निकाली काढले होते.
तरीही न्यायालयात गेलेल्या प्रभागातील निवडणुका पुढे ढकलल्या होत्या त्यानुसार जामखेड नगरपरिषद प्रभाग दोन ब व चार ब निवडणूक होत आहे.