शॉपिगं सेन्टर व शेतकरी भवनाच्या कामावरून व्यापारी असोसिएशन व सभापती आमनेसामने अंर्तगत वाहतुकीसाठी रस्ते ठेवावेत जामखेड मर्चन्ट असोसिएशन बेकायदा बंद ठेवाल तर परवाने रद्द करू – सभापती कार्ले

0
1124

जामखेड न्युज——

शॉपिगं सेन्टर व शेतकरी भवनाच्या कामावरून व्यापारी असोसिएशन व सभापती आमनेसामने

अंर्तगत वाहतुकीसाठी रस्ते ठेवावेत जामखेड मर्चन्ट असोसिएशन

बेकायदा बंद ठेवाल तर परवाने रद्द करू – सभापती कार्ले

जामखेड शॉपिगं सेन्टर व शेतकरी भवनाच्या कामामध्ये अंर्तगत वाहतुकीसाठी रस्ते ठेवावेत अन्यथा व्यावसाय बंद आंदोलन करणार असा इशारा जामखेड मर्चन्ट असोसिएशनने निवेदनाद्वारे दिला आहे. शेतकरी हितासाठी व्यापाऱ्यांनी लिलाव चालू ठेवावेत जर बेकायदेशीर रित्या बंद ठेवाल तर व्यापारी परवाने रद्द करणार असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी दिला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड येथे शेतकरी भवन व शॉपिगं सेन्टर कामास सुरुवात झालेली आहे. सदरचे शॉपिगं सेन्टर व शेतकरी भवनचे कामासाठी. सध्या खोदकाम सुरु आहे. सदरचे शॉपिगं’ सेन्टर व शेतकरी भवनचे कामासाठी होणा-या खोदकामाची पाहणी केली असता. आम्ही सर्व गाळेधार सभासद यांचे मध्ये आपसात चर्चा होवुन सर्वानुमते होणा-या शॉपिगं- सेन्टर व शेतकरी भवनचे कामामध्ये भविष्यात अडचणी निर्माण होणार आहेत. यासाठी आताच सुसज्ज रस्ते ठेवावेत व भविष्यातील अडचणी दूर कराव्यात अन्यथा व्यावसाय बंद आंदोलन करण्याचा इशारा जामखेड मर्चन्ट असोसिएशनने निवेदनाद्वारे दिला आहे.

याविषयी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शाँपिंग सेंटर व शेतकरी भवन काम नियमानुसार आहे. व्यापारी प्रतिनिधी व व्यापारी संचालक यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत आम्ही योग्य ले आउट तयार करून बांधकाम आराखडा केला आहे. आता व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये लिलाव चालू ठेवावेत तशा नोटिस त्यांना दिल्या आहेत. बेकायदेशीर बंद ठेवले तर परवाने रद्द करू असा इशारा सभापती शरद कार्ले यांनी दिला आहे.

जामखेड मर्चन्ट असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. सदरचे शॉपिगं सेन्टर व शेतकरी भवनचे कामापूर्ण झाल्यास प्रवेश दारातुन काही ये जा करण्यास आवश्याक असणा-या रस्त्याची लांबी रुंदी कमी होणार आहे.

२.सदरचे शॉपिगं सेन्टर व शेतकरी भवनचे कामपुर्ण झाल्यास शॉपिगं सेन्टरच्या दोन्ही बाजुन जाणा-या रस्त्याची रुंदी ही देखिल कमी होणार आहे. त्यामुळे भविष्यात सदरचे शॉपिगं सेन्टर व शेतकरी भवनचे मध्ये येणा-या मालवाहतुक गाडयाचे येजा करण्यास अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे गाळेधारक व व्यावसाय करणा-या प्रत्येकाचे व्यापार व व्यावसायावर परिणाम होणार आहे.

3. सदरचे शॉपिगं सेन्टर व शेतकरी भवनचे कामपुर्ण झाल्यास सदरचे मार्केड यार्ड व तसेच शॉपिगं सेन्टर व शेतकरी भवनचे आवश्यक नियोजित पार्किंग सोय व त्याची जागा याबाबत
सध्या खोदकामा वरुन दिसुन येत नाही. सर्व सभासदानी सर्वानमते विचार करुन भविष्यात
अडचण दुर व्हावी म्हणुन रस्ता असावा

४. सदरचे शॉपिगं सेन्टर मध्ये पार्किंग व्यवस्था असावी

५ शॉपिगं सेन्टर व शेतकरी भवनचे काम सुरु असलेल्या ठिकाणी सध्या अनेक व्यावसाय सुरु असुन कामाचे स्वरुप वाढल्यास सदरचे सुरु
असलेल्या व्यावसाय व व्यापार सुरु ठेवण्यास देखिल अडथळा होणार आहे.

६ सदरचे संबधीत गाळेधारक व व्यापारी वर्गाचा व्यावसाय सुरळीत होणेसाठी कांही उपाय योजना याबाबत देखिल खुलास आवश्यक आहे.

७. तसेच सदरचे शॉपिगं सेन्टर व शेतकरी भवनचे
कामपुर्ण झाल्यास सध्या सुरु असलेल्या सर्व गाळे धार व त्यामुळे सध्या सभासद याना व्यावसाय करता येणार नाही.सुरु असलेले सर्व व्यावसाय बंद होणार असुन सदरचे सुरु असलेले सर्व व्यावसाय तसेच सुविधा या तालुक्याचे आर्थीक उत्पन्न तसेच आर्थीक उलाढाल यावर परिणाम होणार आहे.

तरी आपणास वर नमुद सर्व मुदयाचा व आवश्यक खुलाशाचा विचार करुन सध्या सुरु असलेले काम शॉपिंग सेन्टर व शेतकरी भवनाचे होणारे काम स्थगिती करुन भविष्यातील होणा-या अडचणीचा विचार होवुन सदरचे नियोजित कामासाठी पर्यायी जागा उपलब्ध करावी. अथवा सदरचे कामासाठी पुर्वी तयार केलेल्या लेआऊट मध्ये रस्त्याचे व बांधकामाचे मोजमाप कमी करण्यासाठी
कार्यवाही करावी.

या शिवाय जर मोजमाप दुरुस्त करता येत नसेल तर सदरचे शॉपिंग सेन्टर व शेतकरी भवनचे कामासाठी
पाडलेल्या इमारतीच्या जागीच काम व्हावे.

जेणे करुन व्यापारी वर्ग तसेच सर्व सभासदाचे नुकसान होणार नाही.तरी आपणास कळविण्यात येते की सदरचे आमचे मागणीचा विचार
करुन योग्य ती दखल पुढील ७ दिवसात घ्यावी अन्यथा आम्ही सर्व सभासद बाजार समितीमध्ये सुरु असलेले सर्व सभासद योग्य मार्गाने आंदोलन करतील अथवा व्यावसाय बेमुदत बंद ठेवतील
याची नोंद घ्याची.

निवेदनाच्या प्रति
१ मा.साहयक निंबधक साहेब, सहकारी संस्था जामखेड,
२. मा. तसलिदार साहेब जामखेड,
३. मा.पोलीस निरिक्षक साहेब पोलीस स्टेशन जामखेड
४. मा.जिल्हा निबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर
७. मा. पणन मंत्री,महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई

६.मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई
७. मा. श्री. रोहीत पवार साहेब आमदार विधान सभा कर्जत जामखेड

८. मा. श्री. राम शिंदे साहेब सभापती तथा आमदार विधानपरिषद यांना निवेदन पाठवले आहे

निवेदनावर रमेश जरे, सुरेश पवार, राहुल बेदमुथ्था, विनोद नवले यांच्या सह अनेक व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here