विकासाबाबत स्वप्नातील जामखेड घडविणार – आकाश बाफना दोन महाशक्तीच्या दबावामुळे आमचे सहा उमेदवारांची माघार, पहा शिवसेनेचे उमेदवार

0
2498

जामखेड न्युज——

विकासाबाबत स्वप्नातील जामखेड घडविणार – आकाश बाफना

दोन महाशक्तीच्या दबावामुळे आमचे सहा उमेदवारांची माघार, पहा शिवसेनेचे उमेदवार

शिवसेनेकडे भाऊ गर्दी होती पण आयत्या वेळी दोन महाशक्तीच्या दबावामुळे काहींनी धोका दिला यामुळे सहा ठिकाणी आम्ही अपक्षांना पुरस्कृत करणार आहोत. जामखेड च्या विकासासाठी आम्ही
नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त निधी आणून जामखेड चा विकास करू जामखेड शहरात दोन दिग्गज असून देखील जामखेड करांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्ते नीट नाहीत, गटारांची दुरावस्था आहे. मोकाट जनावरे अशा अनेक समस्या आहेत. आम्ही जामखेडचा विकास करून चेहरा मोहरा बदलू स्वप्नातील जामखेड घडवू असे आकाश बाफना यांनी सांगितले.

जामखेड नगरपरिषद निवडणुक रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने नगराध्यक्ष पदासाठी पायलताई आकाश बाफना तर चौवीस जणांना एबी फार्म दिले होते पण दोन महाशक्तीच्या दबावामुळे आमचे सहा उमेदवारांनी अचानक माघार घेतली यामुळे आमच्या कडे एक नगराध्यक्ष व १८ नगरसेवक पदासाठी उमेदवारांची नावे आज जाहीर केले.

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष वाळुंजकर, तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आकाश बाफना,
नितीन कोल्हे, प्रविण बोलभट, गणेश आजबे, शिवाजी विटकर, शिवकुमार डोंगरे, शामिरभाई सय्यद यांच्या सह अनेक शिवसैनिक हजर होते.

यावेळी बोलताना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने म्हणाले की, आम्ही एकदिलाने खेळीमेळीच्या वातावरणात उमेदवार निवडले पण दोन महाशक्तीच्या दबावामुळे आमचे सहा उमेदवार गायब झाले. आमची विकासाची ब्लू प्रिंट तयार आहे. बाफना यांच्या रूपाने तिसरा पर्याय जामखेड करांना उपलब्ध झाला आहे. आम्ही जामखेड करांना अभिमान वाटेल असेच काम करू

यावेळी शामिरभाई सय्यद म्हणाले की,
जनतेच्या मनातील उमेदवार पायलताई आकाश बाफना याच आहेत. शिवसेनेला योग्य नेतृत्व मिळाले आहे. बाफना हे स्वयंसिद्ध नेतृत्व आहे.
जनतेचा फायदा होईल असेच काम करू

जामखेड चा सपना आकाश बाफना हिच टँग लाईन सध्या जोरात सुरू आहे.

शिवसेनेतर्फे एबी फार्म घेऊन गेले व माघार घेतली ते प्रभाग 12 मधुन दोन, दहा प्रभाग एक, नऊ प्रभाग एक, सात प्रभाग एक, तीन प्रभाग एक अशा सहा उमेदवारांनी आम्हाला दोन महाशक्ती च्या दबावामुळे धोका दिला

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे

प्रभाग एक-अ) रेखा मोहन देवकाते,
ब) कु. अंजली उल्हास माने

प्रभाग दोन- अ) रेखा कीरण मराळ,
ब) दिनेश रमेश राळेभात

प्रभाग तीन – अ) शिवाजी ज्ञानदेव विटकर
ब) उमेदवार नाही

प्रभाग चार- अ) नमशा फईमुद्दीन शेख,
ब) विकी सदाफुले.

प्रभाग पाच- अ) विकी संतोष पिंपळे,
ब) वर्षा कैलास माने.

प्रभाग सहा- अ) पुजा अशोक सदाफुले
ब) सोहेल जावेद शेख

प्रभाग सात – अ) दत्तात्रय उर्फ (आण्णा) भिमराव ढवळे
ब) – – – – – – – उमेदवार नाही

प्रभाग आठ- अ) शितल प्रदिप बोलभट
ब) शामिरभाई लतीफ सय्यद.

प्रभाग नऊ – अ) – – – – – – – उमेदवार नाही
ब) तारीफ फर्मान शेख.

प्रभाग दहा – अ) जयओम जालिंदर टेकाळे
ब) – – – – – – – – उमेदवार नाही

प्रभाग आकरा – अ) ऋषीकेश कीसन बांबरसे,
ब) गणेश उत्तम आजबे

प्रभाग बारा – अ) – – – – – – उमेदवार नाही
ब) – – – – – – – -उमेदवार नाही

सहा ठिकाणी आम्ही अपक्षांना पुरस्कृत करणार असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here