शिक्षणाचा उपयोग भविष्याचा वेध घेण्यासाठी करा – सभापती प्रा राम शिंदे दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवाचे विविध मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन

0
950

जामखेड न्युज—–

शिक्षणाचा उपयोग भविष्याचा वेध घेण्यासाठी करा – सभापती प्रा राम शिंदे

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवाचे विविध मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन

 

शिक्षणात अमुलाग्र बदल झाला आहे. त्याचा उपयोग भविष्याचा वेध घेण्यासाठी करावा, आपला इतिहास लोकांनी वाचावा असे काम करावे मी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचा माजी विद्यार्थी आहे. संस्थेने आधुनिक तंत्रशिक्षण शाखा सुरू कराव्यात मी आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे असे मत विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केले.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेस 74 वर्षे पूर्ण होऊन अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. मिलिंद जोशी अध्यक्ष अ. भा. मराठी साहित्य महामंडळ व कार्याध्यक्ष म. सा. प. पुणे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख होते. यावेळी सचिव अरूणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, अ. ल. देशमुख, माजी सचिव शशिकांत देशमुख, राजेश मोरे, श्रीकांत होशिंग, अनंता खेत्रे, ज्ञानदेव मुरूमकर, किसनराव ढवळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, याच बरोबर संस्थेचे आधारस्तंभ असलेले अनेक ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा राम शिंदे म्हणाले की, तरूण पिढी हुशार स्मार्ट आहे. त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल असे शिक्षण मिळावे काळाबरोबर सर्वानी आपल्यात बदल करणे आवश्यक आहे. तरच तो स्पर्धेत टिकून राहतो तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आई वडिलांचे कष्ट आठवा असे आवाहन केले.

यावेळी बोलताना अ. भा. मराठी साहित्य महामंडळ अध्यक्ष व कार्याध्यक्ष म. सा. प. पुणे प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलेच आज यशाच्या शिखरावरती आहेत. कारण कष्ट करण्याची क्षमता ग्रामीण विद्यार्थ्यांमध्येच असते. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांनी न्युनगंड बाळगता कामा नये. आपले वेगळेपण सिद्ध करा पदवी सगळ्या कडेच असते.जीवनात सर्वच क्षेत्र महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी भविष्यात काय व्हायचे ठरवावे त्यानुसार अभ्यास करावा व ज्ञानाचे दार उघडण्याचे काम शिक्षकांनी करावे. स्वतः ला सतत अपडेट ठेवावे, शिक्षकांनी ज्ञानसत्तेचा दरारा निर्माण केला पाहिजे शिक्षक लाडका झाला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी डिजिटल उपवास धरावा असे आवाहन मिलिंद जोशी यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत देशमुख यांनी करताना सांगितले की, संस्थेत हजारो विद्यार्थी घडले, राम शिंदे संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत आपण लवकरच व्यावसायिक शिक्षणाच्या वेगवेगळ्या शाखा सुरू करत आहोत.

आपल्या मनोगतात माजी प्राचार्य होशिंग श्रीकांत यांनी संस्था परिचय करून देताना सांगितले की, १९५१ मध्ये नगर जिल्ह्यात फक्त नगर व संगमनेर येथेच इंग्रजी शिक्षण मिळत होते. त्या काळात
स्वातंत्र्य सैनिक मधुकर देशमुख, मिश्रीलाल कोठारी, दामोदर देशमुख, लक्ष्मण देशमुख, लक्ष्मण भिडे, वसंत माधव देशमुख, स्वातंत्र्य सैनिक शेखलाल शेख हुसेन, आनंदराव काशीद, स्वातंत्र्य सैनिक जी. पी. देशपांडे, राजाभाऊ देशमुख, डॉ. बी. एम महाजन, त्रिंबक डोंगरे यांच्या विचारातून संस्थेची उभारणी केली आज सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

यावेळी संस्थेतील काही गुणी व विविध स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचा सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मल्लखांब स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक स्नेहल भोसले खेलो इंडिया मध्ये निवड, कृष्णा जगदाळे, सिद्धी रासकर, रोहित घुगे, पवन गाडे, सुजित करगळ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड यांचा सत्कार करण्यात आला.

पी आर देशमुख यांनी अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 हजार रुपये देणगी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले उर्फ़ गौरी देशमुख यांनी तर आभार राजेश मोरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here