नगरपरिषदेत महिलाराज हवे, पतीराज नको – रोहिणीताई काशिद ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक कार्यात रोहिणीताई काशिद अग्रेसर

0
351

जामखेड न्युज—–

नगरपरिषदेत महिलाराज हवे, पतीराज नको – रोहिणीताई काशिद

ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक कार्यात रोहिणीताई काशिद अग्रेसर

जामखेड नगरपरिषदेत महिलाराज हवे, पतीराज नव्हे! या ठाम घोषवाक्याने जामखेडच्या राजकारणात नवा विचार मांडत सौ. रोहिणीताई संजय काशिद या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत विशेष चर्चेत आल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे प्रथमच महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा म्हणून रोहिणीताई काशिद यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. हिंदुत्वाची नाळ समाजाशी जोडत महिलांना एकत्र आणणारे नेतृत्व, निर्णयक्षमता आणि संघटनकौशल्य या त्यांच्या कामाचा पाया ठरले आहेत.

सक्षम नेतृत्व, महिला शिवजन्मोत्सव समिती माध्यमातून संघटन, महिलांना स्वसंरक्षणासाठी लाठी काठी मोफत प्रशिक्षण तसेच स्वतःनिर्णय घेणारी, सामान्य नेतृत्व व हिंदुत्व विचारधारेशी ठाम निष्ठा विशेष म्हणजे, भाजप शहर मंडलाध्यक्ष संजय काका काशिद हे रोहिणीताईंचे पती असून त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात ते खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. पत्नीच्या नेतृत्वगुणांवर त्यांचा विश्वास असल्याने त्यांनी नेहमीच तिच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे.

रोहिणीताईंच्या कार्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्वभावना निर्माण झाली असून, महिलाराज हवे, पतीराज नव्हे!या घोषवाक्याला आता समाजात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जामखेड नगरपरिषदेत महिला नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, या नगर परिषदेच्या निवडणुकीत बदलाचे वारे वाहू लागले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

चौकट
भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद तसेच त्यांच्या पत्नी महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशिद हे दाम्पत्य वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करतात. गडकिल्ले स्वच्छता मोहीम, गौरी सजावट स्पर्धा, वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून मुलींना आत्मनिर्भर बनवणे, वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, जिल्ह्यात एकमेव महिला आयोजन शिवजन्मोत्सव साजरा करतात. यासह अनेक सामाजिक व धार्मिक कामाच्या बळावर रोहिणी संजय काशिद या नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार आहेत अशीच चर्चा सध्या महिला भगिनींमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here