पै. चिराग मंगेश आजबे यांच्या साकत गटातील गावभेट दौऱ्याला व घोंगडी बैठकींना मोठा प्रतिसाद
पै. चिराग मंगेश आजबे यांनी जिल्हा परिषद साकत गटात निवडणूक तयारी जोरदार पणे सुरू केली आहे. गावा गावात भेटी गाठी, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेत आहेत. यासाठी अनेक गावात वाजत गाजत स्वागत करण्यात येत आहे. वडिलांप्रमाणेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार असे चिराग मंगेश आजबे यांनी सांगितले.
पै.चिराग आजबे साकत गटातून जिल्हा परिषद निवडणुक लढवणार आहेत. याच दृष्टीने सावरगाव येथील युवक, शेतकरी यांच्याशी चर्चेसाठी सावरगाव येथे गेले असता मोठ्या उत्साहात वाजत गाजत स्वागत करण्यात आले. ग्रामदैवत मारूतीचे दर्शन घेऊन नारळ वाढवून हालगीच्या निनादात मंदिर परिसरात मिरवणुक पार पडली व घोंगडी बैठक संपन्न झाली.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे काही दिवसात बिगुल वाजणार आहे बहुप्रतीक्षेनंतर या निवडणुका होणार आहेत. नेहमी शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यतत्पर आसणारे शेतकरी नेते मंगेश (दादा) आजबे व पै चिराग आजबे यांची साकत गटातील सावरगाव येथे गाव भेट व घोंगडी बैठक संपन्न झाली.
मुलालाच निवडणूकीच्या रिंगणात का उतरवत आहे याबाबत मंगेश दादा आजबेंनी केला खुलासा. २००२ च्या कायद्यानुसार तीन आपत्य आसलेल्या व्यक्तींना निवडणुक लढवता येत नाही वयोमानानुसार आई वडीलांना निवडणूकीसाठी उभे करणे योग्य नाही आणि त्यांच्यापेक्षा तरूण पिढी राजकारणात आली तर कुठं बिघडतयं माझ्या खांद्याला खांदा लावून मुलगा चांगलं काम करीन आसे विरोधकांच्या टिकेला त्यांनी उत्तर दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले की मी आ.रोहीतदादा पवार यांच्या माध्यमातून साकत गटातील गावागावात भेटी देऊन दौरा करत आहोत त्याला शेतकरी बांधव चांगला प्रतिसाद देत आहेत आजपर्यंत मी शेतकर्यांच्या प्रश्नासाठी आंदोलने मोर्च यामाध्यमातून काम केले आहे.
याच माध्यमातून आता लोकशाहीने दिलेल्या आधिकारानुसार तुमच्या सहकार्यने निवडणूकीसाठी सामोरे जात आहोत आसे सांगितले यावेळी मोठ्या संख्येने सावरगाव ग्रामस्थ व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.