जामखेड साकत रस्त्यावर खड्डेच खड्डे, दररोजच लहान मोठे अपघात
जामखेड साकत रस्ता म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा
जामखेड साकत रस्ता म्हणजे सध्या असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे आहेत. रस्त्याची चाळणी झाली आहे. वाहने खिळखिळी तर वाहनचालकांचे मनके खिळखिळी झाली आहेत. ताबडतोब रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी जामखेड न्युजशी बोलताना केली आहे.
जामखेड साकत रस्ता म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा अशी अवस्था निर्माण झाली आहे.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये – जा करतात. साकतचा घाट खुपच अरूंद आहे त्यामुळे वळणाचा नीट अंदाज येत नाहीयातून नेहमीच अपघात होतात. आता तर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. नेहमीच अपघात होत आहेत.
सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग चे काम खुपच संथगती ने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात पण सौताडा घाटापेक्षा साकत घाट कठीण व अरूंद आहे यामुळे चालकाला अंदाज येत नाही यामुळे अपघात होतात. घाट रूंदीकरण करण्याची व खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
एका वर्षात साकत घाटात पंधरा ते वीस अपघात झाले आहेत यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. यामुळे ताबडतोब घाटाचे रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे. तसेच सध्या खड्डे भुजवावेत अशी मागणी होत आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच साकत फाटा ते धोत्री पर्यंत रस्त्यावर अनेक झाडांचे फाटे रस्त्यावर आलेली आहेत. त्याची छाटणी करावी व रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आशी मागणी होत आहे.