आदर्श फाउंडेशन चा आदर्श उपक्रम मिलिंद नगर येथील धोकादायक विहीर बुजवली आदर्श फाऊंडेशन च्या माध्यमातून आकाश व पायलताई बाफना यांचा पुढाकारातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम सुरू

0
193

जामखेड न्युज—–

आदर्श फाउंडेशन चा आदर्श उपक्रम
मिलिंद नगर येथील धोकादायक विहीर बुजवली

आदर्श फाऊंडेशन च्या माध्यमातून आकाश व पायलताई बाफना यांचा पुढाकारातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम सुरू

जामखेड शहरातील मिलिंद नगर परिसरात असलेली जुनी विहीर अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत होती या विहिरीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात घाण साचल्यामुळे नागरिकांच्या येण्या जाण्याला अडथळे निर्माण झाले होते. तसेच धोका निर्माण झाला होता.

पूर्वीची विहीर नागरिकांना पाण्याचा आधार देत होती तीच आता अस्वच्छतेचे आणि धोक्याचे ठिकाण बनली होती या गंभीर समस्येवर आदर्श फाउंडेशन तसेच सौ.पायलताई आकाश बाफना आणि आकाशजी दिलीप बाफना यांनी पुढाकार घेतला व केवळ चार दिवसांच्या कालावधीत या धोकादायक विहिरीला मुरूम टाकून पूर्णपणे सुरक्षितपणे बुजवण्यात आले.

तसेच परिसरातील रस्त्याच्या अडचणी आणि लाईटच्या समस्या देखील सोडवण्यात आल्या आणि प्रभावी कामामुळे मिलिंद नगर परिसरातील सर्व नागरिक अत्यंत आनंदित झाले असून त्यांनी आकाश बाफना आणि पायलताई बाफना यांचा विशेष सत्कार करून आभार व्यक्त केले.

यावेळी तेथील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले की आकाश भाऊ आले आणि त्यांनी तेथील समस्यांची पाहणी केली. त्यांना ती जागा दाखवली सगळीकडे अंधारच अंधार होता ते म्हणाले मी तुम्हाला हे काम आठ दिवसात करून देतो असे आश्वासन दिले परंतु त्यांनी ते काम अवघ्या चार दिवसात पूर्ण केले आणि इतकी मोठी धोकादायक बनलेली खूप जुनी विहीर बुजवून दिली.

त्या विहिरीने कधी काळी पाणी दिले पण ती विहीर जीर्ण अवस्थेत धोकादायक बनली ती विहीर बुजवणे गरजेचे होते.आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून ती विहीर फक्त चार दिवसात बुजवून देऊन तेथील परिसर मुरमीकरण करून स्वच्छ करून दिल्याबद्दल त्यांचे मिलिंद नगर येथील नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात आले.


यावेळी आकाश बाफना बोलताना म्हणाले की ही विहीर दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी होती परंतु तिचा धोका निर्माण झाला होता परंतु हे आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा बघितल्यानंतर येथील परिस्थिती जाणून ठरवलं ती विहीर चार दिवसाच्या आत बुजवून दिली व येथील माता-भगिनींना रात्रीच्या वेळी जाणे येण्यासाठी अंधाराची मोठी अडचण होती ती अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि यापुढे ही या ठिकाणी कोणतीही अडचण असो ती अडचण आम्ही शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करू असे आकाश बाफना यांनी बोलताना सांगितले.

या निमित्ताने रस्त्यावरील अडथळे, लाईटची अडचण आणि स्वच्छतेसंबंधीचे प्रश्नही मार्गी लागले.“नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले,” असे पायलताई बाफना यांनी सांगितले.

चौकट
मिलिंद नगर येथील नागरिकांनी एक मुखाने सांगितले की फक्त चार दिवसात आमच्या परिसराचा चेहरा मोहरा बदलणारे आदर्श फाउंडेशनचे हे खरंच आदर्श कार्य आहे जामखेड शहरात विकास आणि स्वच्छतेचे नव उदाहरण घालून देणाऱ्या आदर्श फाउंडेशन चे आकाश जी बाफना यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here