सौर पंपासाठी लाच घेताना कंत्राटी लाईनमन यास रंगेहात पकडले जामखेड तालुक्यातील प्रकाराने एकच खळबळ

0
1067

जामखेड न्युज—–

सौर पंपासाठी लाच घेताना कंत्राटी लाईनमन यास रंगेहात पकडले

जामखेड तालुक्यातील प्रकाराने एकच खळबळ

सौर पंपासाठी आँनलाईन केलेला अर्ज मंजूर झालेला आहे. तसा मेसेज आला होता व त्यासाठीची रक्कम आँनलाईन भरली होती. सर्व्हे करण्यासाठी आलेल्या कंत्राटी लाईनमन यांनी सर्व्हे फी एक हजार रुपये द्यावी लागेल असे सांगितले यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग अहिल्यानगर यांना कळविले व त्यांनी सापळा लावून रंगेहात पकडले. यामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील महावितरणचे वायरमन सुनील रघुनाथ नागरे यास सौर कृषिपंपासाठी सर्वेक्षण करताना शेतकऱ्याकडून ७०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले मंजूर झालेल्या कृषिपंपा साठी एक हजार रुपयांची मागणी केली होती.

हा प्रकार महावितरणच्या शाखा कार्यालयात मंगळवारी (दि. २८) रोजीदुपारी घडला.या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजू आल्हाट यांच्या तक्रारीवरून जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

अरणगाव शाखा कार्यालय परिसरातलाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या नागरे यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

हे प्रकरण स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि चिंता निर्माण करत आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तत्परता महावितरणच्या कामकाजातील भ्रष्टाचारा विरुद्ध पाहायला मिळते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी न्याय मिळण्याचा आश्वासक संदेश जात आहे.

हे प्रकरण सौर कृषिपंप योजना आणितिच्या कार्यान्वयनातील अडचणींशी निगडीत असून,शेतकऱ्यांनी या प्रकारांबाबत सतर्क राहावे अशी जागरूकतावाढविणे महत्त्वाचे ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here