पुजा गडकर यांच्या वतीने दिवाळी निमित्त प्रभाग पाच मध्ये मिठाई वाटप
प्रभागातील जनतेचा पुजा गडकर यांना वाढता पाठिंबा
जामखेड शहरात अनेक प्रलंबित प्रश्न नागरीकांना भेडसावत आहेत. यामध्ये मुख्य म्हणजे पिण्याचे पाणी, लाईट व रस्ते याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे जनतेच्या प्रमुख अडचणी सोडविण्यासाठी येणार्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 5 अनुसूचित जमाती मधुन उमेदवार प्रा. सौ. पुजा उद्धव गडकर या निवडणुक लढविणार आहेत. याच अनुषंगाने प्रभाग पाचमध्ये पुजा गडकर यांनी दिवाळी निमित्त मिठाई वाटप करुन नागरिकांच्या घेतल्या भेटी-गाठी घेतल्या या दरम्यान त्यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
मागिल काही दिवसापूर्वी जामखेड नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे अनेक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याच अनुशंगाने एक सुक्षिक्षित चेहरा म्हणुन प्रभाग 5 मधुन अनुसूचित जमाती जागेवरून जामखेड येथील प्रा. सौ. पुजा उद्धव गडकर या देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्या दुष्टीने त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे.
प्रभाग क्रमांक 5 मध्ये यावेळी त्यांनी नागरीकांना दिपावळी निमित्ताने मिठाई वाटप करुन नागरिकांच्या भेटी-गाठी घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. सौ पुजा गडकर या नागरीकांच्या अडचणी जाणून घेत असताना त्यांना प्रभागामधील नागरीकांच्या अनेक समस्या दिसुन आल्या.
प्रभाग 5 मध्ये काही नागरिकांना कुठल्याही योजनेचे वेळेवर व पुरेसे पाणी मिळत नाही, तसेच प्रभागा मधील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. प्रभागामधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटाराची देखील दुरावस्था झाली आहे. आपल्या प्रभागामध्ये कचऱ्याचे नियोजन नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरासह प्रभागात मोकाट जनावरे आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी प्रभागात रात्रीच्या वेळी अंधार असल्याने प्रभागात विजेचे दिवे बसवून प्रभाग प्रकाशमय करायचा आहे.
विषेश म्हणजे मी स्वतःता एक शिक्षका आहे आणि भविष्यात प्रभागातील शालेय विद्यार्थींचा शैक्षणिक दर्जा कसा वाढेल याकडे प्रामुख्याने लक्ष देणार आहे.असे देखील सौ. पुजा गडकर यांनी बोलताना सांगितले.
आपल्या या दैनंदिन जीवनातील अडचणीसाठी व भविष्यातील उपाययोजना करणारे दूरदृष्टी सक्षम नेतृत्व म्हणून प्रभाग 5 मधुन अनुसूचित जमाती मधुन प्रा. सौ. पुजा उद्धव गडकर हा सुक्षिक्षित चेहरा समोर आला आहे. प्रभाग पाच मध्ये त्या सध्या प्रबळ दावेदार समजल्या जात आहेत.