जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र झटणारा तरूण – पांडूराजे भोसले

0
255
जामखेड प्रतिनिधी
  परिसरातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र झटणे, सर्वाच्या सुखदुःखात सहभागी होणे, कधी तंबलेली गटार काढणे तर कधी कोठे रस्ता अडचण आहे ती सोडवणे, मुरूम टाकुन रस्ता तयार करणे, लाॅकडाउन काळात तर अनेकांची भुक भागविण्याचे काम पांडू राजे सलग पाच महिने करत होते. लाखो लोकांना घरपोच डब्बे पोहच केले राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथी, गडकिल्ले संवर्धन स्वच्छता अभियान, दिपावली सुट्टीत किल्ले बनवा स्पर्धा अशा विविध सामाजिक उपक्रम वर्षभर पांडू राजे भोसले राबत असतात.
प्रभाग क्रमांक 12 मध्ये जनसेवा, समाजसेवा करण्यासाठी गोरगरीबांचे प्रश्न सोडविण्यासाठी आज हा तरून कामाला लागला आहे. पडेल ते काम हे कृतीतून करून दाखवणे हीच शिकवण अंगीकृत असल्याने प्रभागा मधील श्री राम मंदीर परीसरातील रोड व अंतर्गत गटारीची समस्या तेथील नागरीकांनी पांडुराजे यांना सांगितली व त्यांनी परीस्थिती ची पाहणी करुन स्वतः काम करून नळी टाकली व  स्व – खर्चाने मरूम टाकुन रोड व्यवस्थित करून दिला व तेथील नागरीकांची समस्या दुर केली. काम करण्यासाठी पैसा किंवा कामगारांची गरज लागत नाही फक्त प्रमाणीकपणे काम करण्याची मनामध्ये ईच्छाशक्ती हवी हेच आज जाणवले. पांडुराजे यांना कधीही, कोणीही  व कोणत्याही कामासाठी आवाज द्या क्षणाचाही विलंब न करता ते ताबडतोब मदतीसाठी हजर असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here