जामखेड तालुक्यातील दहा ग्रामपंचायती बिनविरोध – तर 300 जागेसाठी 714 उमेदवार रिंगणात

0
225

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील सारोळा, आपटी, खुरदैठण, वाकी, पोतेवाडी, सोनेगाव, झिक्री, धोंडपारगाव, सातेफळ राजेवाडी या दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर काही ग्रामपंचायतींमधीलकाही प्रभाग बिनविरोध झाले आहेत.
 एकुण 417  जागांपैकी 117 जागा बिनविरोध झाल्या आहेत तर 300 जागांसाठी 714 उमेदवार रिंगणात आहेत.
        जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी आॅनलाईन 1154 तर आॅफलाईन 148 असे एकुण 1302 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननीत 44 अर्ज अवैध झाले त्यामुळे 1258 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. अर्ज माघार घेण्याच्या दिवशी 427 जणांनी माघार घेतली तर 117 जागा बिनविरोध आल्याने आता 300 जागेसाठी 714 उमेदवार निवडून रिंगणात आहेत.
  तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर काही ग्रामपंचायतीचे काही प्रभाग बिनविरोध झाले आहेत आता राहिलेल्या 39 ग्रामपंचायतींसाठी 15 रोजी मतदान होणार आहे.
  बिनविरोध निवड झालेल्या दहा ग्रामपंचायतींपैकी आदर्श गाव सारोळा, आपटी, खुरदैठण, वाकी व पोतेवाडी या पाच ग्रामपंचायती दि. 30 रोजी बिनविरोध झाल्या होत्या तर आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दि. 4 रोजी सोनेगाव, झिक्री, धोंडपारगाव, सातेफळ व राजेवाडी या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर खांडवी मध्ये सात पैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत पिंपळगाव उंडा येथे सात पैकी चार जागा तर नायगाव येथे नऊ पैकी चार जागा, साकत मध्ये 13 पैकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.
    सोनेगाव ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ व सचिन गायवळ यांनी प्रयत्न केले व ग्रामपंचायत बिनविरोध झाली,           धोंडपारगाव ग्रामपंचायत बिनविरोध साठी प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते संतोष पवार यांनी प्रयत्न केले व बिनविरोध केली.
    खुरदैठण ग्रामपंचायत बिनविरोध साठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा महादेव डुचे, ऋषिकेश डुचे, शहाजी डुचे यांनी प्रयत्न केले.
   सारोळा ग्रामपंचायत बिनविरोध साठी युवराज भाऊ काशिद, डाॅ. भगवान मुरुमकर, अजय काशिद, मकरंद काशिद यांनी प्रयत्न करत ग्रामपंचायत बिनविरोध केली.
   झिक्री ग्रामपंचायत बिनविरोध साठी सचिन गायवळ सर, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे यांनी प्रयत्न करत बिनविरोध केली.
   ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली तर तीस लाख रुपयांचा निधी देणार अशी घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली होती. आता दहा ग्रामपंचायतींना हा निधी मिळणार आहे. बिनविरोध ग्रामपंचायती करण्यासाठी
सचिन गायवळ, सुर्यकांत मोरे, रमेश आजबे, संतोष पवार,
यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले.
       आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तहसिल आवारात गावा गावातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंग च
 फज्जा उडाला होता. गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत होती. तसेच माघार घेतलेल्या उमेदवार, चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी अंतिम करण्यासाठी तहसिल आवारात रात्री उशिरा पर्यंत काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here