दिघोळ पंचायत समिती गणासाठी वैजयंती सचिन घुमरे यांची प्रबळ दावेदारी

0
976

जामखेड न्युज—–

दिघोळ पंचायत समिती गणासाठी वैजयंती सचिन घुमरे यांची प्रबळ दावेदारी

 

सहकारातील उभरते नेतृत्व, स्वच्छ चारित्र्य, कामात तत्पर, सभापती प्रा. राम शिंदे यांचे विश्वासू, पक्षाचा आदेश अंतिम मानणारे, धामणगाव व नाहुली सोसायटी वर निर्विवाद वर्चस्व असणारे सचिन घुमरे यांनी दिघोळ महिला राखीव पंचायत समिती गणासाठी पत्नी वैजयंती सचिन घुमरे यांना उभे करावे अशी मागणी गणातील अनेक गावांमधून होत आहे. यामुळे सर्वसाधारण महिला राखीव दिघोळ गणासाठी वैजयंती सचिन घुमरे यांची प्रबळ दावेदारी समजली जात आहे.

जामखेड तालुका भाजपाने नुकतीच सचिन घुमरे यांच्या वर सहकार आघाडीची जबाबदारी दिली आहे. आगोदर ते सरचिटणीस पदावर काम करत होते. ते कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आले होते. त्यांना उमेदवारी दिल्यास नात्यागोत्यामुळे साकत जिल्हा परिषद गटातही पक्षाला फायदा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सभापती प्रा राम शिंदे यांचा सचिन घुमरे यांनी विश्वास संपादन केलेला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त साकत गट व गण तसेच दिघोळ गणात रायटिंग पँडचे शालेय विद्यार्थ्यांसाठी वाटप केले होते. या माध्यमातून ते घराघरात पोहोचलेले आहेत.

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीत दोन्ही पक्षाकडे सम समान सदस्य असल्या कारणामुळे ईश्वर चिट्टी द्वारे निवडी करण्याचे ठरले उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता पण ईश्वर चिट्टी निघाली नाही.

त्यामुळे संधी हुकली दुसऱ्या वेळेस सभापती प्रा राम शिंदे यांच्या आदेशानुसार शांत राहिले त्यामुळे यावेळी दिघोळ गणात पत्नी वैजयंती साठी पक्ष विचार करेल अशी दाट शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here