Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या आदर्श फाउंडेशनच्या वतीने आकाश बाफना यांच्या तर्फे होमगार्ड बंधु भगिनींसाठी दिवाळी फराळ...

आदर्श फाउंडेशनच्या वतीने आकाश बाफना यांच्या तर्फे होमगार्ड बंधु भगिनींसाठी दिवाळी फराळ भेट व बसण्यासाठी बाकडे

0
405

जामखेड न्युज—–

आदर्श फाउंडेशनच्या वतीने आकाश बाफना यांच्या तर्फे होमगार्ड बंधु भगिनींसाठी दिवाळी फराळ भेट व बसण्यासाठी बाकडे

जामखेड परिसरात आदर्श फाउंडेशनने आपल्या सामाजिक कामाने आपला आदर्श निर्माण केला आहे. संपूर्ण शहरासह नगरपरिषद हद्दीत दिवाळी निमित्ताने भेट तसेच सफाई कर्मचारी यांचा सन्मान तसेच परिसरात हजारो ब्रास मुरमीकरण अनेक ठिकाणी पुल दुरूस्ती करत आपला आदर्श निर्माण केला आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुका होमगार्ड कार्यालय येथे आदर्श फाऊंडेशन तर्फे होमगार्ड बंधू भगिनींना दिवाळी फराळ भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच बांधवांच्या सोयीसाठी कार्यालय परिसरात बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली.

यावेळी तालुका समादेशक नागेश घायाळ,पलटन नायक अकबर शेख, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, पलटन नायक आण्णासाहेब पवळ, बिभिषण यादव, राजु जाधव, विठ्ठल जाधव, भारत चव्हाण, संजय साळुंके, हरिश्चंद्र पवार, अतुल पवार, शिवाजी सातव, नासीर खान, किरण बांदल, निलेश गायकवाड, जितेंद्र जाधव, गणेश गायकवाड, विलास पवळ, बुध्दाप्पा माने, कुंडल औचरे तसेच शैला क्षिरसागर, शैला कदम, आशा रूपनर, राखी पवार आदी मान्यवर आणि होमगार्ड बांधव उपस्थित होते.

आदर्श फाउंडेशनच्या आदर्श कामाबद्दल आकाश बाफना यांचा शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बाफना म्हणाले, “ज्या प्रमाणे पोलिस दलावर जबाबदाऱ्या असतात, त्याचप्रमाणे होमगार्ड बांधवही दक्षतेने काम करतात. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.

दरम्यान, यंदा होमगार्ड बांधवांना दिवाळीपूर्वी मानधन न मिळाल्याने त्यांचा सण अंधारात असून याची दखल घेत आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी फराळ भेटवस्तू देऊन माणुसकी जपली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!