महिला व मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या रोहिणी संजय काशिद यांना नगराध्यक्ष पदासाठी महिला व मुलींची सर्वाधिक पसंती

0
223

जामखेड न्युज ——

महिला व मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या रोहिणी संजय काशिद यांना नगराध्यक्ष पदासाठी महिला व मुलींची सर्वाधिक पसंती

महिला व मुलींसाठी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांचे विविध शिबिरे, तलवार बाजी, लाठीकाठी, हळदी कुंकू कार्यक्रम, विधवा महिलांचा सन्मान करणे, दुर्गा वाहन रँली (महिला), रक्तदान शिबीर, विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सन्मान, महिला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा, गड किल्ले स्वच्छता मोहीम, वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मर्दानी खेळांचे शिबीरे, असे विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविणाऱ्या रोहिणी संजय काशिद यांना शहरासह वाडी वस्तीवरील महिला व मुलींची नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक पसंती मिळत आहे.

पारंपरिक सणांतून संस्कृतीचा वारसा जिवंत ठेवत प्रत्येक हिंदू सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात वसू बारस निमित्त रोहिणीताई काशिद यांनी माता भगिनीं सह काल गायींचे विधिवत पूजन करण्यात आले.

भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद तसेच त्यांच्या पत्नी महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशिद हे दाम्पत्य वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करतात.

गडकिल्ले स्वच्छता मोहीम, गौरी सजावट स्पर्धा, वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून मुलींना आत्मनिर्भर बनवणे, वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, जिल्ह्यात एकमेव महिला आयोजन शिवजन्मोत्सव साजरा करतात. यासह अनेक सामाजिक व धार्मिक कामाच्या बळावर रोहिणी संजय काशिद या नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार आहेत अशीच चर्चा सध्या महिला भगिनींमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

सभापती प्रा. राम शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद व त्यांच्या पत्नी महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशिद हे आपल्या जगदंब प्रतिष्ठान मार्फत विविध सामाजिक उपक्रम ते दरवर्षी राबवितात.

जिल्ह्यातील पहिलीच महिला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा रोहिणी काशिद या मोठ्या उत्साहात साजरा करतात. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मुली व महिलांचा सन्मान करण्यात येतो. मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे मुलींमधे आत्मविश्वास निर्माण होतो. यामुळे जीवनातील संकटांचा सक्षमपणे त्या मुकाबला करू शकतात सध्या महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी रोहिणी संजय काशिद यांना अधिक पसंती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here