सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ रूपाली सूरज रसाळ दिघोळ गणातून इच्छूक सभापती प्रा राम शिंदे यांच्या बरोबरचा स्नेह दुसऱ्या पिढीतही कायम
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीसौ रूपाली सूरज रसाळ दिघोळ गणातून इच्छूक
सभापती प्रा राम शिंदे यांच्या बरोबरचा स्नेह दुसऱ्या पिढीतही कायम
सभापती प्रा. राम शिंदे यांचे खंदे समर्थक व सहकारी कै. रामभाऊ रसाळ यांचे दोन्ही चिरंजीव सुरज व धीरज आपला व्यवसाय सांभाळत सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. याच सामाजिक कामाच्या बळावर सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघोळ गणातून निवडणूक लढविण्यासाठी सौ रूपाली सूरज रसाळ या सज्ज आहेत. तशी मागणी होत आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पै. सुरज रसाळ यांचा राजकीय सामाजिक कामांचा धडाकाआपला व्यावसाय सांभाळत असतांना राजकीय व सामाजिक काम देखील जोमाने सुरु आहे. वडिलांच्या नावाने आबासाहेब सामाजिकप्रतिष्ठांनची स्थापना करून शिवजंतीनिमित्त वत्कृत्व स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट किटचे वाटप, नवरात्र उत्सवानिमित्त राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल त्याकुटुंबातील मुलीचे स्वागत म्हणून सुकन्या योजना सुरु करुन मुलींच्या नांवे खात्यावर ५०००/- जमा करुन एफडी करण्यात येत आहे. शालेय स्पर्धेसाठी लागणारे स्पोर्ट किट दरवर्षी खेळाडूंना दिले जाते.
धिरज व सुरज रसाळ यांचे वडील रामभाऊ रसाळ यांनी दिघोळ माळेवाडी गावचे सरपंच म्हणून उत्कृष्टकाम केले आहे. आजही लोक त्यांची आठवण काढतात. तसेच 20 वर्षे ग्रामपंचायत व सोसायटी ताब्यात होती. एक लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणून परिसरात ते प्रसिद्ध होते.
त्यांचाच वारसा मुले पुढे चालवत आहेत. लोकांच्या आग्रहाखातर व सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघोळ गणातून सौ रूपाली सूरज रसाळ निवडणूक लढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे यासाठी रसाळ बंधू सज्ज झाले आहेत.
सौ रूपाली सूरज रसाळ या चेअरमन – वसुंधरा महिला हातमाग mahatex सहकारी संस्था तसेचसंचालिका-आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेवर काम करत आहेत.
सभापती प्रा राम शिंदे यांच्या बरोबर वडिलांचा असणारा स्नेह दोन्ही मुलांनी पुढे जपला आहे. आणि आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दिघोळ गणातून निवडणूक लढवण्यासाठी रसाळ कुटुंब सज्ज झाले आहे. तशी दिघोळ गणातून जनतेची मागणीही आहे.