जामखेड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुग्रीव नारायण वायकर यांची बिनविरोध निवड
आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स फेडरेशनम्हणजेच स्वस्त धान्य दुकानदार संघटना जामखेड तालुकाध्यक्ष पदी सुग्रीव नारायण वायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स फेडरेशनने सुग्रीव वायकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या कामाची दखल घेऊन आपली नियुक्ती जामखेड तालुकाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
आपण राज्य फेडरेशन चे ध्येय धोरणे सर्व सामान्य परवानाधारक व सामान्य जनतेपर्यंत पोहचवावीतही आपणाकडून अपेक्षा तसेच आपण फेडरेशनचे सभासद जास्तीत जास्त कसे वाढतील याचे नियोजन करावे तसेच आपणास पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही निवड तीन वर्षासाठी म्हणजे 2027 पर्यंत आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सतिश हिरडे, विभागीय अध्यक्ष मीनाताई कळकुंबे, सचिव बाबुराव मेमाणे, खजिनदार विजय गुप्ता, तालुकाध्यक्ष सुग्रीव वायकर तसेच जामखेड कार्यकारिणी सदस्य१) बिभीषण तांदळे, २) लक्ष्मण डोके, ३) शांतीलाल वारे, ४) विनोद रंधवे, ५) उषा सुरवसे, ६) विलास तोंडे, ७) मधुकर बांगर, ८) लता खैरे, ९) घनश्याम ढाळे, १०) केरबा जाधव, ११) विमल घोडेस्वार हजर होते. तसेचप्रत्येक तालुक्यातून जिल्हा कमीटीवर दोन सदस्य घेतात यात जामखेड भारत बारवकर, अशोक आजबे याची नियुक्ती करण्यात आली आहे
तालुकाध्यक्ष पदी निवड जामखेड होताच तालुका दुकानदार लक्ष्मण डोके यांनी दुकानदार संघटनेच्या वतीने यांनी नुतन तालुकाध्यक्ष सुग्रीव वायकर यांचा सत्कार केला.
यावेळी जामखेड न्युजशी बोलताना नुतन तालुकाध्यक्ष सुग्रीव वायकर म्हणाले की, दुकानदारांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करून त्यांना मदत करणारजिल्हाध्यक्ष यांच्या मदतीने वेळेत कमिशन मिळण्यासाठी प्रयत्न करणार दुकान दारांवर अन्याय झाल्यास अन्याय दूर करण्यासाठी न्याय लढा देणार तसेच माजी अध्यक्ष भारत काकडे यांच्या आदर्श कामाप्रमाणे सर्व दुकानदारांना सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करणार. प्रलंबित मागण्यांसाठी (जसे की थकीत कमिशन, धान्य वाहतूक खर्च, शासकीय योजनांचा लाभ) सरकारकडे वेळोवेळी आंदोलन, निवेदने आणि बैठकांद्वारे पाठपुरावा करणार असे सांगितले.