जामखेड जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण जाहीर, काहींना सोयीचे तर काहींना अडचण
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्या यांच्या गट व गणांचा आरक्षण कार्यक्रम आज जाहीर केला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची आज दि. १३ ऑक्टोबरला काढण्यात आली यानुसार पुढील प्रमाणे आहे. यामुळे काहींना सोयीचे तर काहींना अडचण निर्माण झाली आहे.
जामखेड तीन जिल्हा परिषद गटाचे आरक्षण साकत – सर्वसाधारण खर्डा – सर्वसाधारण जवळा – ओबीसी महिला राखीव
पंचायत समितीच्या सहा गणाचे आरक्षण पुढीलप्रमाणे
जवळा पंचायत समिती गण एस्सी महिला, अरणगाव पंचायत समिती गण -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दिघोळ – सर्वसाधारण महिला साकत – सर्वसाधारण शिऊर – सर्वसाधारण खर्डा – सर्वसाधारण
जिल्हा परिषद गटांची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती गणांची सोडत संबंधित तहसीलदारांतर्फे काढण्यात आली राज्य शासनाने चक्राकार (फिरते) आरक्षण पद्धत रद्द करत लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षण निश्चितीची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.
आरक्षण कार्यक्रम ६ ऑक्टो. : जिल्हाधिकाऱ्यांनी अनु. जाती व अनु. जमाती यांच्या जागा निश्चित करून प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करणे
८ ऑक्टो. : विभागीय आयुक्तांनी राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देणे
१० ऑक्टो. : जिल्हाधिकारी यांनी आरक्षण सोडतीची अधिसूचना प्रसिद्धी करणे
१३ ऑक्टो. : जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद गट व तहसीलदार यांनी पंचायत समिती गणांची आरक्षणाची सोडत काढणे
१४ ऑक्टो. : जिल्हाधिकारी यांनी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे
१४ ते १७ ऑक्टो. जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी
२७ ऑक्टो. : जिल्हाधिकारी यांनी प्राप्त हरकती व सूचना अभिप्रायासह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करणे
३१ ऑक्टो. : विभागीय आयुक्त यांनी आरक्षण अंतिम करणे
३ नोव्हेंबर : अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करणार येणार आहे.