शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके पाऊस, वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावी
अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी हैराण असतानाच हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात दोन दिवसात पुन्हा वादळी पाऊस सांगितलेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी काढणी केलेले पीके सुरळीत ठेवावीत.
सध्या सोयाबीन काढणी व पेरणीची लगबग सुरू आहे सध्या काही दिवस उघड दिल्याने कामे सुरू आहेत.
अतिवृष्टी ने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकात पाणी असल्याने पीके डॅमेज झालेली आहेत त्यामुळे बाराजारात कवडीमोल भावाने पीके विकावी लागत आहेत यातच आता पुन्हा पाऊस सांगितला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र, 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित असून किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे.
सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते, जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.