जामखेड तालुका शिक्षक समन्वय समितीच्या तालुकाध्यक्षपदी संतोष डमाळे तर सरचिटणीस पदी नवनाथ बहिर यांची बिनविरोध निवड

0
239

जामखेड न्युज—–

  1. जामखेड तालुका शिक्षक समन्वय समितीच्या तालुकाध्यक्षपदी संतोष डमाळे तर सरचिटणीस पदी नवनाथ बहिर यांची बिनविरोध निवड

 

तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दिनांक 11 ऑक्टोंबर 2025 रोजी शिक्षक बँक जामखेड येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जामखेड तालुका शिक्षक समन्वय समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी सर्वानुमते एकमताने तालुकाध्यक्षपदी संतोष डमाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी हनुमंत निंबाळकर व जालिंदर राऊत तर सरचिटणीस पदी नवनाथ बहिर सर यांची निवड करण्यात आली.

उर्वरित तालुका कार्यकारणी खालील प्रमाणे –
कोषाध्यक्ष- प्रदीप कांबळे , अशोक घोडेस्वार
कार्यालयीन चिटणीस- मल्हारी पारखे, अंकुश महारनवर उपाध्यक्ष- अनिल आष्टेकर सर , दत्तात्रय यादव सर, महिला प्रतिनिधी – अर्चना भोसले मॅडम, मनिषा वाघ मॅडम दिव्यांग शिक्षक प्रतिनिधी -सुभाष फसले, नारायण लहाने मार्गदर्शक- राम निकम , किसन वराट, वैजनाथ गीते, नारायण राऊत , संतोष राऊत, उत्तम पवार , संभाजी तुपेरे, दत्तात्रय भोसले
याप्रमाणे सर्व कार्यकारिणी निवडण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संभाजीराव थोरात गट, शिक्षक समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, शिक्षक परिषद , जुनी शिक्षक पेन्शन योजना, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन ईब्टा संघटना , शिक्षक भारती वस्ती शाळा शिक्षक संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, मुख्याध्यापक शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना , दिव्यांग शिक्षक संघटना , आदी बहुसंख्या शिक्षक संघटनांचे सुमारे 50 मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.

मागील आठवड्यापासून तालुक्याची नवीन शिक्षक समन्वय समिती स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. तेव्हापासून नियोजन करून आज दुपारी 2 वाजता तालुक्यातील सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना या शिक्षक समन्वय समितीमध्ये समाविष्ट होण्यासाठी व चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. जे प्रतिनिधी उपस्थित होते त्यामधून सदर कार्यकारणी निवडण्यात आली.

यावेळी प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्याने या समन्वय समिती निवडी संदर्भात आपले मत व्यक्त केले .त्यानंतर प्रत्येक संघटने कडून प्रतिनिधींची नावे एकत्र करून यामधून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

शिक्षक समन्वय समिती यापुढे दरमहा गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याबरोबर बैठका घेऊन शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

सर्वांनी आपले प्रश्न शिक्षक समन्वय समिती यांच्याकडे द्यावेत व ते सोडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नूतन अध्यक्ष श्री संतोष डमाळे सर यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण राऊत सर यांनी केले तर आभार श्री वैजिनाथ गीते सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here