नेते व्यस्त, अधिकारी स्वस्थ, जनता त्रस्त प्रशासनाविरोधात जामखेड बचाव कृती समिती स्थापन

0
621

जामखेड न्युज—–

नेते व्यस्त, अधिकारी स्वस्थ, जनता त्रस्त

प्रशासनाविरोधात जामखेड बचाव कृती समिती स्थापन

जामखेड शहराच्या विकासासाठी व अडचणी संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून आणी निवेदने देउन पण समस्या जैसे थे च आहेत म्हणून त्रस्त नागरिकांनी एकत्र येत अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाविरोधात आवाज उठवण्यासाठी आशा भेळ बीड रोड‌ जामखेड येथे  दिनांक १०/१०/२०२५ रोजी मीटिंग आयोजित केली होती.

यामध्ये उपस्थित नागरिका पैकी सुनिल जगताप यांनी या अडचणी सोडवण्यासाठी कृती समिति असावी असा ठराव मांडला याला‌ सर्वानुमते मान्यता दिली अध्यक्ष म्हणून बाबासाहेब चंदन यांची उपाध्यक्ष पदी सतिश राजगुरु यांची आणि प्रफुल्ल सोळंकी यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी सल्लागार म्हणून  सुनील जगताप, अँड. महारुद्र नागरगोजे व अँड.ऋषीकेश डुचे यांची निवड करण्यात आली. तसेच उपस्थित नागरिक सदस्य म्हणून कार्यकारणीत समाविष्ट करण्यात आले.

यामधे अशोक मामा पितळे, महेंद्र कदम, विजय राळेभात, बालाजी आजबे, रमेश कोल्हे, आकाश बाफना, बालाजी राळेभात, प्रशांत शिंदे, अनिल जगदाळे, आनंद बाफना, मनोज राउत, गणेश आजबे, भास्कर डहाळे, नितीन मुनोत, अमोल पेचे, महेश यादव, महेश भोगल, प्रमोद गांधी, प्रतीक राळेभात, आप्पासाहेब सोंडगे, बाळासाहेब मुळे,  तुषार बोरा, तुषार बोथरा आदी उपस्थित होते.

समीती गठीत होताच मुख्य रस्त्यावरील धुळ , शहरातील स्वच्छता, पार्कीग साठी जागा  मोकाट जनावरे यांसंदर्भात मुख्याधिकारी जामखेड नगरपरिषद यांना निवेदन दिले.

तसेच मेन बाजार पेठतील गर्दी लक्षात घेता वाहतुक संदर्भात पोलीस निरिक्षक साहेब व तहसीलदार यांना व वरिल कामे दिवाळी पुर्वी करावेत अशी विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here