अपघातील जखमी काळवीट ला वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची तत्परता अपघातील जखमींना वाचवण्यात अग्रेसर असणारे संजय कोठारी पाण्यांना वाचवण्यासाठीही अग्रेसर

0
644

जामखेड न्युज—–

अपघातील जखमी काळवीट ला वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची तत्परता

अपघातील जखमींना वाचवण्यात अग्रेसर असणारे संजय कोठारी पाण्यांना वाचवण्यासाठीही अग्रेसर

जामखेड नगर रस्त्यावरील रुईछत्तीसी गावाजवळ बुधवारी भरदुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. एका चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेमुळे काळवीट हरीण अचानक रस्त्यावर आले या धडकेमुळे काळवीट गंभीर जखमी होऊन रस्त्यावर तडफडत पडले होते. याच वेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी थांबून वनविभाग व पोलीस स्टेशनला संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवले.

संजय कोठारी हे आपल्या सहकाऱ्यांसह जामखेड येथून अहिल्यानगर येथे एका लग्नासाठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांना ही घटना दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपले वाहन थांबवले आणि तात्काळ काळवीटाला रस्त्याच्या कडेला सुरक्षित स्थळी हलवले. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्या प्राण्याला पाणी पाजण्याचाही प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने तोपर्यंत त्या काळवीटाचा जागीच मृत्यू झाला होता.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कोठारी यांनी त्वरित अहिल्यानगर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड तसेच सहाय्यक वनरक्षक गणेश मिसाळ राहुरी यांच्याशी संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती दिली. यासोबतच त्यांनी 112 हेल्पलाइन वर देखील संपर्क साधून आवश्यक ती मदत मागवली. काही वेळातच पोलिस व वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि काळवीटाचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दाखवलेली संवेदनशीलता, प्राणिमात्रांविषयीची करुणा आणि सामाजिक जबाबदारी खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांनी आजवर अनेक वन्यजीवांचे प्राण वाचवले असून, त्यात — मोर, लांडोर, घुबड, साप, गांडुळ, मांडुळ, हरिण, काळवीट, तरस, कोल्हा, बहीर ससाणा, वटवाघुळ, कासव इत्यादींचा समावेश आहे.

या सर्व जखमी प्राण्यांना त्यांनी वनअधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन उपचारानंतर पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची व्यवस्था केली आहे. तसेच रस्त्यावर किंवा शेतांमध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या फिरस्त्या मूक प्राण्यांवर त्यांनी स्वतः खर्च करून उपचार केले असून, अनेकांचे प्राण वाचवले आहेत. या कामी सुमित चानोदिया, समद शेख, पोलीस कॉन्स्टेबल अमोल लोखंडे यांनी मदत केली

“प्रत्येक नागरिकाने प्रवास करताना रस्त्यांवरून जाणाऱ्या वन्यजीवांचे रक्षण करणे, अपघात झाल्यास प्रशासनास माहिती देणे आणि शक्य असेल तिथे मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य आहे,” असे आवाहन संजय कोठारी यांनी या प्रसंगी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here