Wednesday, March 4, 2026
Home राजकारण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादया तयार कोणाची काही...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादया तयार कोणाची काही हरकत असल्यास या तारखेपर्यंत लेखी सादर कराव्यात

0
407

जामखेड न्युज—–

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादया तयार

कोणाची काही हरकत असल्यास या तारखेपर्यंत लेखी सादर कराव्यात

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकदाच्या जाहीर झाल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती आरक्षण पण जाहीर झाले आहे. सदस्य आरक्षण १३ तारखेला निघणार आहे आता प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील सर्व लोकांना या जाहीर प्रसिध्दीव्दारे कळविण्यात येते की,

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकी करिता राज्यनिवडणूक आयोग यांचेकडील आदेश क्र. रानिआ/जिपपंस 2025/प्र.क्र.20/का-7 दिनांक 23/09/2025अन्वये मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

अहिल्यानगर जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायतसमिती सार्वत्रिक निवडणूकीकरिता दिनांक 1/07/2025 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारयादी मधून प्रारूप मतदार यादी तयार केली असून ती यांदी आज दिनांक 8/10/2025 रोजी प्रसिध्द केलेली आहे.

या प्रारुप मतदार यादीची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय/जिल्हा परिषद कार्यालय/सर्व तहसिल कार्यालय/सर्वपंचायत समिती कार्यालय यांचे कार्यालयामध्ये पाहणीसाठी व निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

यायादीसंदर्भात नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या दिनांक 14/10/2025 पर्यंत संबंधित तहसिल कार्यालयात कार्यालयीन वेळेत लेखी सादर कराव्यात. या दिनांका नंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करण्यात येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!