जामखेड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, वाहतुकीसाठी हे रस्ते बंद

0
872

 

जामखेड न्युज—–

जामखेड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, वाहतुकीसाठी हे रस्ते बंद

 

गेल्या पाच सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे एकच हाहाकार उडाला आहे. अनेक रस्ते पुल पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावे वाड्या वस्त्या यांचा संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे घरांच्या भिंती ओल्या झाल्याने कोसळत आहेत.

अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे खालील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

🔴 पिंपरखेड – अरणगाव रस्ता (पूलावर पाणी)
🔴 फक्राबाद – अरणगाव रस्ता (पूलावर पाणी)
🔴 चोंडी – चापडगाव रस्ता (पूलावर पाणी)
🔴 दिघोळ – माळेवाडी रस्ता (पूलावर पाणी)
🔴 खर्डा – तेलंगशी रस्ता (रस्ता खचला)
🔴 खर्डा – जायभायवाडी रस्ता (खड्डे पडले)
🔴 नान्नज – जवळके रस्ता (पूलावर पाणी)
🔴 राजुरी – पिंपळगाव उंडा रस्ता (पूलावर पाणी)

🔴 वाघा – पिंपळगाव उंडा रस्ता (पूलावर पाणी)
🔴 धनेगाव – सोनेगाव रस्ता (पूलावर पाणी)
🔴 जामखेड – रत्नापूर रस्ता (पूलावर पाणी)
🔴 साकत – कोल्हेवाडी रस्ता (पूलावर पाणी)
साकत – कडभनवाडी
🔴 नायगाव रोड – बांधखडक रस्ता (पाण्याखाली)
🔴 पांढरवाडी गावठाण – चव्हाणवस्ती रस्ता (वाहून गेला)
🔴 पिंपळगाव उंडा – तरडगाव रस्ता (पूल पाण्याखाली)
🔴 तरडगाव – सोनेगाव रस्ता (पूल खचला)

नागरिकांनी या मार्गांचा वापर टाळावा. पर्यायी मार्गाचा अवलंब करून सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे.

जामखेड तालुक्यात गेल्या पाच सहा दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. तालुक्यात सर्वच मंडळात सरासरी ओलांडली आहे. यामुळे आगोदरच ओव्हरफ्लो असलेली धरणे, नद्या, ओढे यांचे पाणी शेतात शिरलेले आहे. पीके पाण्यात आहेत तर मोठ्या प्रमाणावर रस्ते उखडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खैरी नदीला पूर आला आहे दरडवाडीचा पूल बंद आहे. तसेच आनंदवाडी चा पूल बंद आहे. यामुळे जामखेड तुळजापूर वाहतूक मार्ग बंद आहे.

बांधखडकचा पूल वाहून गेला आहे त्यामुळे संपर्क तुटला आहे. यामुळे तालुक्यातील पावसाने दैनिय अवस्था झाली आहे. नाहुली भिलारे वस्ती पुल वाहून गेला आहे. राजुरी येथून पिंपळगाव आळवा, पिंपळगावउंडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी होते. जामखेड तुळजापूर रस्ता ही पाण्यात होता. शेती, पीके, पशुधन याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

तालुक्यात नऊ जनावरे दगावली आहेत.
लेहनेवाडी येथील शेतकरी शरद प्रभाकर पवार यांच्या ७ शेळ्या मृत्यूमुखी भवरवाडी येथील पोपट अण्णा शिंदे यांची गायवाहून गेली तर मोहा येथील कैलास सजगणे यांची १ मेंढी ओढ्यात वाहून गेली आहे. अनेक घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांत पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

 

 

पिंपळगाव उंडा, सावरगाव, घोडेगाव, खुरदैठण, मोहरी, राजुरी, शिऊर, मुंजेवाडी, वंजारवाडी, तरडगाव, वाघा यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली तर अनेक घरात पाणी शिरले असल्याने जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले आहे. जवळके येथील हनुमान मंदिर पाण्यात गेले आहे. जोरदार पाऊस सुरूच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here