विभागीय स्पर्धेत जामखेड महाविद्यालय ठरले चॅम्पियनशिप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अहिल्यानगरक्रीडा विभागीय स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाला कुस्ती स्पर्धेत चॅम्पियनशीप ठरले आहे. चार सुवर्णपदक, दोन रौप्य व तीन कांस्य पदकाची खेळाडूंनी कमाई केली आहे. त्यांचे अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
मंगळवार दिनांक 23-९-२०२५ रोजी छत्रपती महाविद्यालय श्रीगोंदा येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत जामखेड महाविद्यालय चॅम्पियनशिप चे मानकरी ठरले आहेत. या स्पर्धेत जामखेड महाविद्यालय जामखेडचे विजयी खेळाडूं
या सर्व खेळाडूंनी वेगवेगळ्या वजन गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक, रौप्यपदक, कास्य पदक, पटकविले तसेच चॅम्पियनशिप मिळाल्याबद्दल सर्व जेष्ठ क्रीडा संचालक यांनी डॉ.आण्णा मोहिते यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
वरील विजेते खेळाडू अहिल्यानगर जिल्हा विभागीय सोमेश्वर नगर बारामती येथे होणाऱ्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेचे वरील सर्व खेळाडूं जिल्हाचे नेतृत्व करणार आहेत.
या सर्वांची विभागीय स्पर्धेला निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री उद्धव बापू देशमुख,उपाध्यक्ष श्री दिलीपशेठ गुगळे,सचिव श्री अरुणशेठ चिंतामणी, खजिनदार श्री शरदकाका देशमुख,मा शशिकांत देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉ.सुनिल जी. पुराणे,उपप्राचार्य सुनिल.वाय. नरके, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.आण्णा मोहिते, व सर्व संचालक मंडळ आणि प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व कुस्ती स्पर्धेतील खेळाडूंचे अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.