महिलांसाठी खास सोय २४-२५ सप्टेंबरला मोहटा देवी दर्शन, आकाश बाफना यांचा स्तुत्य उपक्रम
जामखेड शहरातील अनेक सामाजिक प्रश्न पदरमोड करून सोडविणारे समाजसेवेत अग्रेसर असणारे आकाश बाफना यांनी आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून जामखेड मधील महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शन यात्रा आयोजित केली आहे. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आकाश बाफना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. दि. 24 सप्टेंबर बुधवार व दि. 25 सप्टेंबर गुरूवार रोजी सकाळी आठ वाजता आपापल्या प्रभागासाठी व पोलीस स्टेशन समोर मोफत मोहटादेवी दर्शन यात्रा गाड्या उपलब्ध असणार आहेत. महिलांसाठी महाप्रसाद व फराळांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या महिलांना शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये मोहटादेवी दर्शनासाठी जायचे आहे त्यानी आदर्श फाउंडेशनच्या फोन नंबर 8400200240 तसेच 7031004004 या नंबर वरती संपर्क करावा व आपली जागा पक्की करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
आकाश बाफना यांनी आपल्या आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक शहरातील अनेक सामाजिक प्रश्न सोडविलेले आहेत. मोरे वस्तीवरील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मोरे वस्तीवरील पुलाचा प्रश्न बाफना यांनी प्रत्यक्षात पाहणी करत प्रशासनाच्या आदेशाची वाट न पाहता पुलाच्या दुरूस्तीची जबाबदारी उचलली.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे बाफना कुटुंबिय यात आपल्या आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आकाश बाफना यांनी मोठी भर घातली आहे. शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग नोंदवत आपला आदर्श निर्माण केला आहे. गणेश मंडळाच्या सन्मानानंतर आता मिलिंदनगर भागातील तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारा साठी आकाश बाफना पुढे सरसावले आहेत.
आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आकाश बाफना यांनी पदरमोड करत पुल दुरूस्ती, मंदिर दुरूस्ती, गणेश मंडळांचा सन्मान असे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात.
ही सामाजिक उपक्रमशील परंपरा नवरात्री उत्सवाला अधिक मंगलमय करणारी ठरणार असल्याचे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.