अर्जुन घोलप व मंजुषा सोले यांना नानेवाडीतील ग्रामस्थ व आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने निरोप समारंभ सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य भेट

0
728

जामखेड न्युज—–

अर्जुन घोलप व मंजुषा सोले यांना नानेवाडीतील ग्रामस्थ व आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने निरोप समारंभ

सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य भेट

आज शनिवार दि.१३ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा नानेवाडी येथे श्री. अर्जुन घोलप सर व श्रीम. मंजुषा सोले मॅडम यांचा निरोप समारंभ संपन्न झाला त्या निमित्ताने भावनिक होऊन नानेवाडीतील ग्रामस्थ व आजी माजी विद्यार्थ्यांनी त्यांना निरोप दिला.

नानेवाडी शाळेत नव्याने हजर झालेले श्री. नामदेव गर्जे व श्रीम. सुनंदा बांगर यांचे मोठ्या जल्लोषात ग्रामस्थांनी स्वागत केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.गोरक्ष चौधरी हे होते .या प्रसंगी विद्यार्थ्यांनी व श्री. भिमराव कापसे (सरपंच ग्रामपंचायत मोहा ), श्री. शिवाजी (काका ) डोंगरे (मा. सरपंच ग्रामपंचायत मोहा ), श्री. संतोष हापटे सर (मुख्याध्यापक मोहा)श्री. अर्जुन,घोलप सर व श्रीम. मंजुषा मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.

ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.श्री. भाऊसाहेब मंडाळके व श्री.प्रशांत देडे यांनी कौटुंबिक स्नेह म्हणून सर व मॅडम यांना गाव रुढी प्रमाणे संपूर्ण पोशाख भेट देण्यात आले . सरपंच श्री.भिमराव कापसे यांच्या कुटुंबाच्या वतीने श्री. घोलप सर व श्रीम.सोले मॅडम यांचा संपूर्ण पोशाख देऊन सत्कार करण्यात आला . चौधरीवस्ती, डोंगरेवस्ती मंडळकेवस्ती व नानेवाडी ग्रामस्थांनी भेट वस्तू, फोटो फ्रेम,पोशाख देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी उपसरपंच सौ.संगिता देडे,श्री नानाभाऊ बांगर, श्री.बाळासाहेब देडे,श्री.संजय देडे,श्री.भाऊसाहेब मंडाळके, श्री.सुरेश देडे,श्री.सचिन चौधरी ,श्री.बजरंग चौधरी, श्री. बाळकृष्ण चौधरी, श्री.एकनाथ देडे,श्री.दत्तात्रय ठेंगील, श्री. तुकाराम चौधरी ,श्री.राजेंद्र ठेंगील चि.अक्षय देडे, श्री.पप्पू देडे,श्री.भारत डोंगरे, श्री.दत्ता मंडळके, श्री.बाळू सजगणे श्री.आण्णासाहेब चौधरी,अंगणवाडी ताई सौ. कमल चौधरी, सौ.सुवर्णा चौधरी ,सौ. मनिषा चौधरी तसेच महिला माता पालक बहूसंख्येने उपस्थित होते.

या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मुलांना वही, पेन शालेय साहित्य वाटप केले. श्री. घोलप सर व श्रीम. सोले मॅडम यांच्याकडून शाळेस पोडीअम ( भाषण स्टॅण्ड ) व सर्व विद्यार्थांना कंपास बॉक्स सप्रेम भेट देऊन कतज्ञता व्यक्त केली. ह.भ.प. संतोष चौधरी यांचे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात मोलाचं सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप ओझा सर यांनी केले त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here