मल्लखांब स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाची स्नेहल भोसले जिल्ह्यात प्रथम
आंतर विद्यापीठ व खेलो इंडिया स्पर्धेतील जामखेड महाविद्यालयची खेळाडू स्नेहल भोसले हि मल्लखांब स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आली आहे.
आज शनिवार दिनांक १३-९-२०२५ रोजी पेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेत जामखेड महाविद्यालय जामखेडची राष्ट्रीय मल्लखांबपट्टू कु.स्नेहल दत्तात्रय भोसले हिने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकविले.
अहिल्यानगर जिल्हा विभागीय संघात निवड होऊन BMCC कॉलेज डेक्कन पुणे येथे होणाऱ्या आंतरविभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री उद्धव बापू देशमुख,उपाध्यक्ष श्री दिलीपशेठ गुगळे,सचिव श्री अरुणशेठ चिंतामणी, खजिनदार श्री शरदकाका देशमुख,मा शशिकांत देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉ.सुनिल जी. पुराणे,उपप्राचार्य सुनिल.वाय. नरके यांच्या सह
शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.आण्णा मोहिते, बबलु (वस्ताद) टेकाळे, अमोल निमोणकर, व सर्व संचालक मंडळ आणि प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्नेहलचे अभिनंदन केले व विभागीय व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
चौकट
एल एन सी टी विद्यापीठ भोपाळ येथे जानेवारी मध्ये झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ All India Inter University (राष्ट्रीय) मल्लखांब स्पर्धेत,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला रौप्यपदक व पिरॅमिड प्रकारात कास्यपदक मिळवून देण्यास हातभार लावणारी जामखेड महाविद्यालयाची खेळाडूं कु.स्नेहल दत्तात्रय भोसले हिची एप्रिल मध्ये होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली होती याठिकाणी तिने चमकदार कामगिरी केली होती.