देशातील खरे चोर अदानी अंबानी – सुजात आंबेडकर जामखेड मध्ये वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे फुंकले रणसिंग

0
332

जामखेड न्युज—–

देशातील खरे चोर अदानी अंबानी – सुजात आंबेडकर

जामखेड मध्ये वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे फुंकले रणसिंग


देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणा-या भटक्या विमुक्त समाजाला ब्रिटिशांनी गुन्हेगाराचा शिक्का लावला तो आजतागायत कायम आहे. हा समाज मुख्य प्रवाहात जायचे ठरवल्यास त्याच्या बरोबर जातीयवाद केला जातो. आपले प्रश्न व समस्या राजकारणातून निर्माण होतात. अन्याय अत्याचार झाला तर न्याय राजकारणामुळे मिळत नाही त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त लोक निवडून द्या असे आवहान वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी रविवारी अयोजीत भटक्या विमुक्तांच्या राज्यव्यापी परिषदेत बोलताना केले. ग्रामीण विकास केंद्र व डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या वतीने जामखेड येथील महावीर भवन येथे भटके विमुक्त राज्यव्यापी परिषद रविवारी अयोजीत केली होती.

यावेळी मार्गदर्शन करताना युवा नेते सुजात आंबेडकर बोलत होते. तत्पूर्वी जुन्या तहसील कार्यालयापासून भटके विमुक्त आपले पोषाख परिधान करून आले होते. तसेच बरोबर नंदीबैल, उंट, घोडे घेऊन पायी महावीर भवन पर्यंत वाजतगाजत आले होते. मोठय़ा प्रमाणावर लोक आल्यामुळे सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

गावात शहरात कोठेही चोरी झाली तर आमच्या भटक्या समाजातील पारधी, भिल्ल, गोसावी इतर समाजाच्या घरी पोलीस जातात व त्यांना उचलून आणतात. ब्रिटीश राज्य करत होते त्यावेळी त्यांनी भटक्या विमुक्तांना गुन्हेगार घोषीत केले. स्वातंत्र्यासाठी लढणा-या या जाती होत्या. स्वातंत्र मिळाले तरी समाजावरील गुन्हेगारीचा शिक्का अद्याप गेला नाही. या देशाचे खरे चोर अदानी, अंबानी आहेत पण पोलीस त्यांच्या घरी जात नाही ही शोकांतिका आहे. आपला समाज भटका आहे. पण त्यांच्या घरी, तांड्यावर अद्याप कोणत्याही सुविधा पुरवल्या नाहीत. वीज, पाणी व रस्ता या मुलभूत सुविधा मिळत नाही. मुख्य प्रवाहात जायचे ठरवल्यास जातीयवाद पसरवला जातो.


आपले प्रश्न व समस्या राजकारणातून निर्माण होतात. अन्याय अत्याचार झाले तर न्याय राजकारणामुळे मिळत नाही. त्यामुळे समाजातील एक गट सत्तेत गेला तर तो या समाजाकडे दुर्लक्ष करतो तर दुसरा गट समाजाबरोबर राहतो. समाजाचे प्रश्न व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा जेव्हा ओबीसी, भटक्या विमुक्त बरोबर जेव्हा अन्याय झाला तेंव्हा वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीमागे राहीले आहे. सत्तेबरोबर जाण्यापेक्षा समाजाबरोबर जाणे अवाश्यक आहे. अँड. अरूण जाधव व किसन चव्हाण यांनी या शोषितांचे प्रश्न मांडून त्यांच्या बरोबर राहीले याचा मला अभिमान आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अँड. डॉ. अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, आदिवासी नेते अनिल जाधव, डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे नंदू मोरे, लोकाधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापू ओहोळ भटके-विमुक्त, आदिवासी संयोजन समितीच्या सदस्या उमाताई जाधव यांनी प्रास्ताविक केले. ललिता पवार, लता सावंत, पल्लवी शेलार, रेश्मा बागवान व शितल पवार यांनी विविध ठरावांचे वाचन केले. बापू ओव्होळ, राजू शिंदे, तुकाराम भटके मुक्तांची रॅली निघाली होती. या रॅलीमध्ये बहुरूपी, गोसावी, उमाजी नाईक वेशभूशा, वासुदेव, मरीआईवाला, पोतराज, नंदीवाले, कुरमुडी जोशी, स्मशान जोगी, फासेपारधी, वैदु, उंटवाले, जोशी, वाघ्या मुरळी, मदारी, भोई, डोंबारी, कैकाडी, आदी सहभागी झाले होते. महावीर मंगल कार्यालयातील विचार पिठावर सुप्रसिद्ध शाहीर शीतल साठे व सचिन माळी आणि सहकाऱ्यांचा नवयान आंबेडकरी जलसा सादर झाला. या परिषदेमध्ये मुस्लिम पंच कमिटी, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी संघटना, प्रहार संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल पवार, सोमनाथ भैलुमे, संतोष चव्हाण, वैजिनाथ केसकर, मच्छिंद्र जाधव, ऋषिकेश गायकवाड, रामदास गायकवाड, संदीप आखाडे, सचिन भिंगारदिवे, राजू शिंदे, अशोक मोरे, अंकुश पवार, कल्याण आव्हाड, कांतीलाल जाधव, आतिश पारवे, राहुल पवार, शब्बीर भोसले, डीसेना पवार, भीमराव सुरवसे , सचिन चव्हाण, बापू गायवाड, सुरेखाताई सदाफुले, उर्मिला कवडे, मंगल शिंगाने, शितल काळे, आसाराम काळे, अविनाश काळे, गणपत कराळे, नरसिंग भोसले, सिनिता कांबळे, लाला वाळके, जाकीर तांबोळी आदींनी परिश्रम घेतले

चौकट
राज्यव्यापी परिषदेत पाच ठराव मंजूर ——————————-
१)३१ ऑगस्ट या दिनास महाराष्ट्र सरकारने शासकीयस्तरावर भटके विमुक्त दिवस म्हणून घोषणा करत मान्यता दिल्याबद्दल शासनाचा अभिनंदनचा ठराव
२)भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी स्वतंत्र्य मंत्रालयाची स्थापना करावी व या मंत्रालयाचे मंत्री हे भटके विमुक्त समाजातील असावेत.
३) भटक्या विमुक्त समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी ‘अॅट्रॉसिटी’ कायद्याचे संरक्षण मिळावे,
४) अनुसूचित जाती जमाती राज्य आयोगा प्रमाणे महाराष्ट्रात कायम स्वरूपी भटक्या विमुक्तासाठी स्वंतत्र आयोग स्थापन करावा.
५) राज्यातील भटक्या विमुक्त समुदायातील लोकांची जातनिहाय जनगणना व्हावी. वरील पाच ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here