मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड मार्केट यार्ड पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय दि. जामखेड मर्चंट असोसिएशन मार्केट यार्ड जामखेड यांनी घेतला आहे. तसे निवेदन सभापती व सचिव यांना देण्यात आले आहे तसेच तहसीलदार यांचा ही प्रत दिली आहे.
दि. जामखेड मर्चंट असोसिएशन मार्केट यार्ड जामखेड चे अध्यक्ष रमेश जरे, उपाध्यक्ष सुशिल बेदमुथ्था, सचिव मारूती काळदाते, खजिनदार संजय टेकाळे, कार्यकारी मंडळ भागवत पवार, त्रिंबक कुमटकर, अंबादास सरडे, हामिद शेख, संदीप भंडारी यांनी तसे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की उपरोक्त विषयांस अनुसरून आपणांस विनंती पूर्वक कळविण्यांत येते की, मराठा आरक्षण मिळावे या करिता दि. २९/०८/२०२५ पासून मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई येथे आमरण उपोषण चालू आहे. सदर आंदोलनास पाठिंबा दर्शविण्या करिता आपले कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेड जि. अहिल्यानगर मधील सर्व व्यापारी बांधव दि. ०३/०९/२०२५ ते ०७/०९/२०२५ पर्यंत मार्केट यार्डामधील सर्व व्यवहारबंद ठेवणार आहेत. तरी कृपया याची नोंद घ्यावी.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकलं आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीच्या मॅरेथॉन बैठका सुरु आहेत.
पण मनोज जरांगे पाटील यांना समाधान कारक तोडगा अद्याप मिळू शकलेला नाही, त्यामुळे चौथ्या दिवशीही आंदोलन कायम राहणार आहे.राज्यात सध्या पावसाने ब्रेक घेतला आहे.
राज्यातील कानाकोपऱ्यातून मुंबई तील बांधवांसाठी सिधा भाकरी, ठेचा, चटणी, लोणचं, फळे, फरसाण, बिस्किटे असे वाहने भरून जात आहेत. आणि तालुके बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे.