सनराईज् शैक्षणिक संकुलात दहीहंडीचा जल्लोष! विद्यार्थ्यांनी लुटला मनमुराद आनंद

0
300

जामखेड न्युज—–

सनराईज् शैक्षणिक संकुलात दहीहंडीचा जल्लोष! विद्यार्थ्यांनी लुटला मनमुराद आनंद

जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज् शैक्षणिक संकुलामध्ये दि. 18 ऑगस्ट रोजी गोपाळकाला व श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांचा सहभाग, उत्साह पारंपरिक वेशभूषेने भरलेला हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.कार्यक्रमाची सुरुवात सनराईज् इंग्लिश स्कूल येथील श्रीकृष्णाच्या वेशातील चिमुकल्यांच्या स्वागताने झाली.

यानंतर पारंपरिक बँड-वाद्यांच्या गजरात दहीहंडी फोडण्याचा मुख्य सोहळा पार पडला स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेज साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय. विद्यार्थ्यांनी एकत्र येत (4) मानवी मनोरे तयार करत दहीहंडी फोडली.

हंडीपर्यंत पोहोचण्याचा रोमांचक प्रयत्न करून हंडी फोडली.संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड भोरे संचालक प्रा. तेजस दादा भोरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन कौतुकास्पद असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

“संस्कृती जोपासण्यासोबतच एकत्रित काम करण्याची भावना अशा कार्यक्रमांतून वृद्धिंगत होते,” असे म्हणाले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.सनराईज् मेडिकल & एज्युकेशन फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे याचे पथकाला गोविंदांना 1000.1 रुपये बक्षीस संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड भोरे यांच्या हस्ते देण्यात आले.


सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त, सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ झाली. संपूर्ण परिसरात दहीहंडीचा जल्लोष पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सुनील घाडगे यांनी व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here