जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव ओव्हरफ्लो, तरीही जामखेड करांच्या नशिबी आठ दिवसाआड पाणी जामखेड करांना उजणीच्या पाण्याची प्रतिक्षा

0
446

जामखेड न्युज—–

जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव ओव्हरफ्लो, तरीही जामखेड करांच्या नशिबी आठ दिवसाआड पाणी

जामखेड करांना उजणीच्या पाण्याची प्रतिक्षा

घाटमाथ्यावर सध्या गेल्या चार ते पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जामखेड शहराची जीवनदायी असलेला भुतवडा तलाव मंगळवार दि १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी शंभर टक्के भरला आहे. यामुळे सांडवा ओसंडून वाहत आहे. तलाव भरल्याने परिसरातील शेतकरी व शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. भुतवडा तलावा बरोबरच खर्डा परीसरातील मोहरी तलाव देखील शंभर टक्के भरला आहे. तलाव भरला तरी जामखेड करांच्या नशिबी आठ दिवसाआड पाणी आहे. जामखेड करांना उजणीच्या पाण्याची प्रतिक्षा आहे.

एकेकाळी चोवीस तास पाणीपुरवठा होणारे शहर म्हणून जामखेड ची ओळख होती आता शहराचे आकारमान लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. नगरपरिषदेने चांगले नियोजन केल्यास दिवसाआड पाणी मिळू शकते पण नगरपरिषदेचे कसलेही नियोजन नाही.

जामखेड शहराला वरदान ठरलेला भुतवडा तलाव हा ११९ दशलक्ष घनफूट आहे. तर जोडतलावाची पाणी साठवणूक ५६ दशलक्ष घनफूट आहे जोडतलाव भरल्यावर ते पाणी भुतवडा तलावात येते दोन्ही तलाव शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागिल चार ते पाच दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बीड जिल्ह्य़ातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ रामेश्वर धबधब्याच्या वरती असलेला भुरेवाडी तलाव देखील भरला आहे. सध्या रामेश्वर धबधबा ओसंडून वाहत आहे. भुतवडा तलाव १०० टक्के भरला असल्याने सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे खाली असलेल्या रत्नापूर तलावातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जामखेड शहरासाठी उजणी धरणातून पाणी पुरवठा योजना मंजूर झाली 70 ते 75 टक्के कामही पुर्ण झाले आहे पण ठेकेदाराच्या मते बील फक्त वीस टक्के मिळाले आहे. यामुळे कधी उजणीचे पाणी येणार आणि दररोज पाणीपुरवठा होणार याचीच प्रतिक्षा जामखेड कर करत आहेत.

चौकट

भुतवडा तलावातून जामखेड शहराला पाणीपुरवठा होत आहे. विना लाईटचा संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होत असतो पण आता शहराची लोकसंख्या पाहता भुतवडा तलावातील पाणी शहराला पुरत नाही त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून जामखेड शहराला आठ दिवसांतून एकदाच एक तास पाणी मिळत आहे. शहर वाशियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या उजनी जलशयातुन जामखेड शहरासाठी पाईपलाईन चे काम सुरू आहे यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी जाणार आहे. तो पर्यंत मात्र जामखेड करांना भुतवडा तलाव भरला असला तरी आठ दिवसाआड पाणी मिळत असल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

चौकट

घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील एकमेव भुतवडा तलाव शंभर टक्के भरला. भुतवडा तलावानंतर मोहरी तलाव देखील शंभर टक्के भरला असुन तालुक्यातील सर्वात मोठा खैरी माध्यम प्रकल्प ६० टक्के, रत्नापूर तलाव ८ टक्के, धोत्री तलाव ५० टक्के, धोंडपारगाव तलाव ३५ टक्के, नायगाव ३० टक्के, तेलंगशी तलाव २१ टक्के, पिंपळगाव आवळा तलाव ३३ टक्के, जवळके तलाव ४२ टक्के भरला आहे. सध्या भुतवडा तलावातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असल्याने लवकरात लवकर रत्नापूर तलाव शंभर टक्के भरेल अशी आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here