विद्यार्थांनो आरोग्याची काळजी घेतली तरच भविष्य उज्ज्वल – सुप्रिया कांबळे

0
83

जामखेड न्युज—–

विद्यार्थांनो आरोग्याची काळजी घेतली तरच भविष्य उज्ज्वल – सुप्रिया कांबळे

चांगल्या आरोग्याचा पाया आयुष्याच्या सुरुवातीपासूनच सुरू होतो हे ओळखून. बालपणापासून विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेतली तर भविष्य उज्ज्वल आहे. असे मत सुप्रिया कांबळे यांनी व्यक्त केले.

मंगळवार दिनांक 19/8/2025 रोजी ल ना होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रामीण रुग्णालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम सभागृहात ‘ एड्स जनजागृती व विद्यार्थ्यांचे आरोग्य ‘ वा विषयावर ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशक सुप्रिया कांबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना वरील विचार मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ल ना होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री बी.ए.पारखे साहेब होते तर प्रमुख पाहुण्या सुप्रिया कांबळे या होत्या.

कांबळे मॅडम यांनी बालवय व किशोरावस्थेतील मुलांनी व मुलींनी कोणती काळजी घ्यावी, आपल्या घरी आईवडिलांशी मनमोकळा संवाद कसा साधावा, अभ्यास करताना आरोग्य कसे सांभाळावे इ विषयांवर मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष बी ए पारखे साहेब यांनी कांबळे मॅडम यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. अहिल्यानगर जिल्हयात एक नंबरचे कार्य व समुपदेशक म्हणून कांबळे मॅडम यांनी जामखेडचे नाव महाराष्ट्रात अग्रेसर केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.


कार्यक्रमासाठी उपमुख्याध्पक श्री राजमाने साहेब, पर्यवेक्षक व एन सी सी विभाग प्रमुख श्री देडे सर, समारंभ विभाग प्रमुख श्री नरेंद्र डहाळे , पोपट जगदाळे, रोहित घोडेस्वार, उमाकांत कुलकर्णी, श्रीमती दराडे मॅडम, सुपेकर मॅडम, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर वृंद व इ आठवी, नववी, दहावीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दराडे मॅडम यांनी तर आभार श्रीमती सुपेकर मॅडम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here