दिल्लीतील स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या झेंडावंदन कार्यक्रमासाठी जामखेड तालुक्यातील या दाम्पत्याची विशेष अतिथी म्हणून निवड

0
1247

जामखेड न्युज—–

दिल्लीतील स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या झेंडावंदन कार्यक्रमासाठी जामखेड तालुक्यातील या दाम्पत्याची विशेष अतिथी म्हणून निवड

दिल्ली येथील 15 आँगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी काही खास सन्माननीय व्यक्तींना आमंत्रित करण्यात येत असते यासाठी जामखेड तालुक्यातील या दाम्पत्याची खास अतिथी म्हणून निवड झाली आहे. यामुळे जामखेड करांसाठी हा खास अभिमानाचा क्षण आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा गावच्या सरपंच सौ.संजीवनीताई पाटील व त्यांचे पती जामखेड बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील यांना 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्य दिन समारंभास दिल्ली येथे लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रण दिल्याने खर्डा व परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.

दिनांक 13ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत या विशेष सन्मानित करण्यात आलेल्या सरपंचाची सर्व व्यवस्था भारत सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातून फक्त १५ सरपंचांना दिल्ली येथे होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.पंचायत राज महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे गुणवत्तेवर आधारित निकषानुसार नावे सुचविण्यात आली होती.

यामध्ये खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत हर घर जल योजना, ग्रामस्वच्छता अभियान,प्रधानमंत्री आवास योजना,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना,मिशन इंद्रधनुष्य योजना,सक्षम अंगणवाडी आरोग्य योजना, प्रधानमंत्री सूर्य घर योजना,मिशन इंद्रधनुष योजना,आदी निकषावर काम करणाऱ्या सरपंचाची निवड झाली आहे.यामध्ये खर्डा ग्रामपंचायत च्या विद्यमान सरपंच सौ.संजीवनी ताई पाटील यांची निवड झाल्याने विशेष अतिथी म्हणून त्यांचा व त्यांच्या पतीचा सन्मान होणार आहे. हा खर्डा शहर व परिसरासाठी निश्चितच अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे.

खर्डा येथील ग्रामपंचायतचे सदस्य,भाजपाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, व्यापारी,पत्रकार व मित्र परिवार यांनी पाटील दाम्पत्याचे अभिनंदन केले आहे.

या निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे साहेब,माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर आबा राळेभात,प्रा. सचिन सर गायवळ,मा.भगवान मुरूमकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, भाजपा तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे, शहराध्यक्ष संजय काका काशीद,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, नानासाहेब गोपाळघरे,महिला आघाडी शहराध्यक्ष संगीताताई पारे, दिपाली गर्जे,संजय गोपाळघरे, भागवत सुरवसे, महालिंग कोरे,गणेश शिंदे,महेश दिंडोरे,सोपान गोपाळगरे राजू मोरे,प्रशांत कांबळे,एकनाथ गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, सरपंच अँड.सुभाष जायभाय,संतोष जायभाय,सरपंच गणेश लटके,सरपंच जयराम खोत,इत्यादींनी त्यांचे अभिनंदन व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here