ड्रायव्हर च्या मुलांची शैक्षणिक भरारी सर्वासाठी अभिमानास्पद जामखेड तालुक्यातील वंजारवाडी छोट्या गावातील सहा मुलांची तीन वर्षांत वैद्यकीय शिक्षणासाठी निवड

0
1349

जामखेड न्युज——-

ड्रायव्हर च्या मुलांची शैक्षणिक भरारी सर्वासाठी अभिमानास्पद

जामखेड तालुक्यातील वंजारवाडी छोट्या गावातील सहा मुलांची तीन वर्षांत वैद्यकीय शिक्षणासाठी निवड

 

जामखेड- वंजारवाडी(धा) गावचे रहीवाशी श्री बाळासाहेब मिसाळ यांनी मुलांच्या शिक्षणाबाबतीत समाजापुढे मोठा आदर्श प्रस्तापित केला आहे, पिकअप टेंपो चालवुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या बाळासाहेबांनी मुलांना शिक्षणाचे धडे मात्र चांगले गिरविले आहेत. तीन्ही मुलांनी शैक्षणिक भरारी घेत संपूर्ण तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे.

बाळासाहेब मिसाळ यांची मोठी मुलगी वैष्णवी बाळासाहेब मिसाळ BAMS (अहिल्यानगर) येथे व मुलगा वैभव बाळासाहेब मिसाळ गव्हरमेंट रिसर्च सेंटर (IISER BHOPAL) येथे शिक्षण घेत आहेत
छोटी मुलगी वनश्री बाळासाहेब मिसाळ हिचा गव्हरमेंट मेडीकल कॉलेज जळगाव येथे MBBS साठी नंबर लागला आहे.

सध्याच्या काळात पालकांची इंग्लिश मिडीयम कडे असलेली ओढ आणि त्यासाठी लागणारा भरमसाठ पैसा आणि यामधुनच मुलांना यश मिळत ही व्याख्याच बाळासाहेब मिसाळ आणि त्यांच्या मुलांनी खोडुन काढली या तिनही मुलांच प्राथमिक शिक्षण हे खामगाव (जामखेड) येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण अरणगाव (जामखेड) येथे झालं आहे कुठलेही खासगी क्लास नाही,रोज शाळेसाठी ३ ते ४ किलोमीटरचा पायी प्रवास अशा खडतर परस्थितीतही या तिनही मुलांनी मिळवलेलं यश नक्कीच अभिमानास्पद आहे.

मुलांच्या शैक्षणिक यशात पालक,तसेच खामगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री रामहरी बांगर सर व त्यांचे सहकारी शिक्षक तसेच श्री अरणेश्वर विद्यालय अरणगाव येथील शिक्षकांचही योगदान आहे.

मुलींची शिक्षणात होत असलेली प्रगती ही सामाजिकदृष्ट्या अत्यंत चांगली बाब आहे,
श्री संत भगवान बाबा यांनी दिलेली शिकवण आहे. तीच मिसाळ कुटुंबियांनी आचरणात आणली.

जमीनी विका पण लेकर शिकवा

हाच आदर्श पालकांनी डोळ्यासमोर ठेवल्याने,
वंजारवाडी गावातुन गेल्या तीन वर्षात सहा मुलींची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली आहे ऐश्वर्या आदिनाथ मिसाळ BHMS
वैष्णवी बाळासाहेब मिसाळ BAMS
प्रतिक्षा आजिनाथ जायभाय BAMS
अदिती आदिनाथ मिसाळ BAMS
स्नेहा संतोष नागवडे MBBS
वनश्री बाळासाहेब मिसाळ MBBS
वंजारवाडी सारख्या छोट्याशा गावात ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबातुन जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन या मुलींनी मिळवलेलं यश हे नक्कीच समाजापुढ आदर्श ठेवणारं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here