हर घर तिरंगा अभियात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी होण्याचे जामखेड भाजपाचे आवाहन उद्या भव्य दिव्य तिरंगा बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे बापुराव ढवळे व संजय काशिद यांचे आवाहन
हर घर तिरंगा अभियात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी होण्याचे जामखेड भाजपाचे आवाहन
उद्या भव्य दिव्य तिरंगा बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे बापुराव ढवळे व संजय काशिद यांचे आवाहन
देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, राज्यस्तरापासून गावपातळीपर्यंत तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने 13 ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे व शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी केले आहे.
संपूर्ण जामखेड तालुक्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकाविण्यासाठी जामखेड भाजपाने जोरदार मोहिम सुरु केली आहे. शहरासह संपूर्ण तालुक्यात जनजागृती भाजपा ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे व शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या वतीने जोरदार जनजागृती मोहीम राबवली आहे.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत उद्या गुरूवार दि. 14 रोजी जामखेड शहरात भव्य दिव्य तिरंगा बाईक रँली सकाळी ९.३० वाजता शासकीय विश्रामगृहापासून निघणार आहे.
तिरंगा यात्रेचा मार्ग शासकीय विश्रामगृह नगर रोड- खर्डा कॉर्नर – तपनेश्वर रोड- धर्मयोद्धा चौक – मिलिंद नगर बीड रोड – बीड कॉर्नर- जय हिंद चौक – छत्रपती शिवाजी महाराज मेन पेठ – लक्ष्मी चौक (संविधान स्तंभ)- खर्डा चौक येथे समारोप होईल.
या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाच्या वतीने ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे व शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी केले आहे.
तसेच गुरूवारी सायंकाळी अखंड भारत संकल्प यात्रा काढण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कायम ‘अखंड भारत’ ही संकल्पना जाहीरपणे मांडली आहे. भारतीय जनता पार्टीकडूनजाहीरपणे समर्थन करण्यात आले आहे.
राज्यात मागील तीन वर्षापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे.