साकतच्या अरूंद घाटामुळे मोठ्या वाहनांची विचित्र अवस्था, लवकरात लवकर घाटाचे रूंदीकरण व्हावे
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे सौताडा घाटात काम अपुर्ण असल्यामुळे अनेक वाहने साकत मार्गे ये जा करतात पण साकतचा घाट अरूंद असल्यामुळे मोठ्या व अवजड वाहनांना वळण बसत नाही. यामुळे सतत अपघाताची मालिका सुरूच असते. आज दोन मोठे अवजड वाहने एका वळणावर अडकल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे लवकरात लवकर घाटाचे रूंदीकरण व्हावे अशी मागणी होत आहे.
साकत घाट अरूंद आहे. यामुळे अवजड वाहनांना टर्न बसत नाही. यामुळे नेहमीच अपघात होतात यामुळे ताबडतोब जामखेड साकत रस्ता व घाटाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे. सध्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ता ही खराब झाला आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. घाटात अवजड वाहनांची अशी विचित्र अवस्था होते.
गेल्या दोन वर्षांत जवळपास दहा ते पंधरा लहान मोठे अपघात या घाटात झाले आहेत. त्यामुळे घाटाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच अनेकांना अपंगत्व आलेले आहे.
आज सायंकाळी पाच वाजता घाटात खालील वळणावर दोन वाहने अडकले होते. यामुळे बराच वेळ दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुढे गाडी रस्ता सोडून गेलेली होती तर मागील गाडी जवळच खेटून होती. मागची गाडी मागे घेता येत नव्हती. बराच वेळ अशी विचित्र अवस्था होती.
लवकरात लवकर जामखेड साकत रस्ता दुरूस्ती तसेच रूंदीकरण व घाट रूंदीकरण व्हावे अशी मागणी होत आहे. दोन वर्षांपूर्वी करमाळा पाटोदा साकत मार्गे या रस्त्याचा सर्व्हे झाला होता. आशियाई बँकेकडून रस्ता होणार होता. राष्ट्रीय महामार्ग सारखा रस्ता होणार होता तो रस्ता लवकर व्हावा अशी मागणी होत आहे.
अरूंद घाटामुळे मोठ्या वाहनांची अशी विचित्र अवस्था होत आहे.