तीन दिवसांत पाच जणांच्या मृत्यूने हळहळला जामखेड सह अवघा परिसर हुंडा, रस्ता अपघात, ठेकेदाराचा हलगर्जीपणा यामुळे बळी

0
2115

जामखेड न्युज—–

तीन दिवसांत पाच जणांच्या मृत्यूने हळहळला जामखेड सह अवघा परिसर

हुंडा, रस्ता अपघात, ठेकेदाराचा हलगर्जीपणा यामुळे बळी

मागील आठवड्यात जामखेड तालुक्यातील तीन वेगवेगळ्या दुख:दायक घटनांनी जामखेड सह अवघा परिसरात शोककळा पसरली अचानक घडलेल्या घटनेमुळे नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी मुले शाळेतून आल्यावर दोन्ही चिमुकल्या मुलांना बरोबर घेऊन विहिरीत उडी घेत आई सह दोन लेकरांची आत्महत्या काळीज पिळवून टाकणारी आहे. तसेच पंधरा दिवसांपुर्वी रस्ता अपघातात मृत्यूशी झुंज देणारा मंगेश थोरवे यांचे शनिवारी निधन झाले तर रविवारी विजेचे काम करणारा कामगार गणेश भोरे हाय होल्टेज करंट बसून मृत्यू पावला तीन दिवसात पाच जणांच्या मृत्यूने जामखेड सह पाटोदा, भूम तालुका हळहळला

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच जामखेड तालुक्यात असेच प्रकरण घडले आहे आजही समाजात हुंडा सारख्या अनिष्ट प्रथेमुळे अन्याय अत्याचार होत आहेत अनेक वैष्णवी हगवणे व रूपाली उगले बळी जात आहेत. यासाठी कडक उपाययोजना हव्या आहेत तसेच मुलींनीही समोर येऊन पोलीसात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. हुंडा सारखी किड समाजातून हद्दपार होणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी सुनेचा छळ सासू सासरे, नंनद करताना दिसतात महिलेचा छळ पुरूषापेक्षा महिलाच ज्यास्त करताना दिसतात. यात अशिक्षित व सुशिक्षित दोन्ही गटात छळ होताना दिसतो. आज समाजात मुलींची संख्या कमी आहे ग्रामीण भागात अनेक तरुण लग्नाळू आहेत. लग्नाची प्रतिक्षा करत आहेत मुलगी मिळत नाही. मुलीच्या नातेवाईकांना पैसे देऊन लग्न करतात नंतर काही ठिकाणी छळ होतो.

शुक्रवारी दि. ८ आँगस्ट रोजी घरबांधणी व विहिर खोदण्यासाठी पाच लाख रुपये द्यावेत यासाठी पती, सासरे, ननंद व नंदावा यांच्या कडून सतत छळ होत होता या छळाला कंटाळून रूपाली नाना उगले वय २५ मुलगा समर्थ नाना उगले वय ६ साक्षी नाना उगले वय ४ रा. नायगाव ता. जामखेड यांनी सायंकाळी ५.३० च्या आसपास घराजवळील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वरील चार जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता रूपाली उगले हिने दोन्ही मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. सायंकाळी आठ वाजता तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणले पण माहेरकडील नातेवाईकांनी गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन करू नये अशी मागणी केली यानुसार आज शनिवारी सकाळी खर्डा पोलीस स्टेशनला मयत रूपालीचे पती,नाना प्रकाश उगले, सासरे प्रकाश पंढरीनाथ उगले रा. नायगांव ता. जामखेड तसेच तिची ननंद मनिषा शिवाजी टाळके व तिचे पती शिवाजी गोरख टाळके रा. राळेसांगवी ता. भुम जि. धाराशिव या चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर बारा साडे बारा वाजता शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह घेऊन जात असताना राजुरी च्या पुढे गेल्यावर परत मृतदेह आडवला सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी नातेवाईकांनी केली बराच वेळ गोंधळ सुरू होता नंतर पोलीसांनी मध्यस्थी करत मार्ग काढला यानंतर नायगाव येथे सायंकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुसरी घटनाजामखेड तालुक्यातील सावरगाव येथील मंगेश अशोक थोरवे यांचा दि. २७ जुलै २०२५ रोजी जामखेड जवळील बीड रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर अपघात झाला होता. यात मंगेश गंभीर जखमी झाला होता त्यास अहिल्यानगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पंधरा दिवस मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली शनिवारी सायंकाळी मंगेश थोरवे यांनी अखेरचा निरोप घेतला.

दि. २७ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच च्या आसपास बीड रोडवरील फरशीच्या दुकानातून जामखेड कडे मोटारसायकल वर येत असताना पाठीमागून येणाऱ्या वेगवान चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली यात ते गंभीर जखमी झाले होते. पंधरा दिवसांनंतर मृत्यू झाला. वेगावर नियंत्रण हवे.

 

तिसरी घटना जामखेड तालुक्यातील लोणी फाटा येथे मुख्य लाइन जवळ पोल रोवण्याचे काम सुरू असताना ठेकेदारांने योग्य काळजी न घेतल्यामुळे ट्रॅक्टर मुख्य लाइनच्या पोल ला धडकला ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न करत असलेला कामगार गणेश दिलीप भोरे (वय ३५) रा. देवदैठण ता. जामखेड हा करंट बसून जागीच मृत्यू झाला यामुळे देवदैठण परिसरात शोककळा पसरली आहे.

दुपारी खर्डा जवळ लोणी फाटा येथे खाजगी ठेकेदार लाइटचे काम करत असताना उताराला लावलेला ट्रॅक्टर मुख्य पोलवर जाऊन धडकला नंतर यामुळे ट्रॅक्टर मध्ये करंट उतरला ट्रॅक्टर मागे घेण्यासाठी गेलेला गणेश भोरे जागीच मृत्यू पावला. ट्रॅक्टर जवळ असलेले दोन कामगार सुदैवाने वाचले.

खर्डा परिसरात महावितरण च्या हलगर्जीपणा मुळे बाळगव्हान येथे काही दिवसांपूर्वी बाप लेकांचा करंट बसून मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच वीज ठेकेदाराच्या निष्काळजीपणा मुळे परत कामगाराचा बळी गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here