विद्यार्थ्यांना मिळालेले बक्षीस हीच खरी जीवनाची ऊर्जा आहे – प्रा. मधुकर राळेभात चार वर्षांत 142 विद्यार्थ्यांना 62,30,400 शिष्यवृत्ती मिळवून देणारा विद्याभारती एकमेव क्लास
विद्यार्थ्यांना मिळालेले बक्षीस हीच खरी जीवनाची ऊर्जा आहे – प्रा. मधुकर राळेभात
चार वर्षांत 142 विद्यार्थ्यांना 62,30,400 शिष्यवृत्ती मिळवून देणारा विद्याभारती एकमेव क्लास
जामखेड सारख्या भागातील विद्याभारती क्लास च्या माध्यमातून चार वर्षांत 62 लाख रुपयांची शिष्यवृत्ती हि सोपी गोष्ट नाही. यामुळे विद्यार्थ्यांना खरी ऊर्जा मिळणार आहे. आणि हिच खरी यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे असे मत प्रा. मधुकर राळेभात यांची व्यक्त केले.
विद्याभारती क्लास च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड. डॉ. अरूण जाधव, नगरसेवक अमित चिंतामणी, पत्रकार सुदाम वराट, उद्योजक विपुल कुलकर्णी, डॉ. राजकुमार सानप, आनंद जाधव, म्हेत्रे सर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा राळेभात म्हणाले की, विद्याभारती क्लास मुळे परिसरातील शाळेत स्पर्धा परीक्षा सुरू झाल्या, सध्या अनेक पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाचे फँड आहे. पण खरे शिक्षण मातृभाषेतून मिळते. ते कायमस्वरूपी टिकाऊ असते असे सांगितले.
यावेळी बोलताना अँड. डॉ अरुण जाधव म्हणाले की, आई वडिलांसोबत बक्षीस घेणे हा विद्यार्थी जीवनातील खरा आनंद आहे. शिक्षणामुळे माणसाला माणूस पण प्राप्त होते. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या स्पर्धेबरोबर आयुष्याच्या स्पर्धेत उतरून यश मिळवा असे आवाहन केले. सध्या निवारा बालगृहात अनेक आई वडील नसलेल्या मुलांना निवारा व शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. सध्या मी शंभर लेकरांचा बाप आहे. वीस पंचवीस वर्षांत हजार मुलांचा बाप होणार आहे.
यावेळी बोलताना नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले की, विद्याभारती क्लासचे नाव जाधव मॅडम यांनी राज्यात नेले आहे. चमकदार कामगिरी केलेली आहे.
यावेळी बोलताना पत्रकार सुदाम वराट म्हणाले की,वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षेत विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले आहे. यात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत हवी आहे.
यावेळी विद्याभारती क्लासच्या संचालिका लक्ष्मी जाधव मॅडम म्हणाल्या की, एका विद्यार्थ्यांंपासून क्लास सुरू केला आज शेकडो विद्यार्थी आहेत. आपल्या क्लास मुळे परिसरातील शाळेत शिष्यवृत्ती, एनएमएमएस परीक्षाचा प्रसार झाला. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे पालकांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. पहिल्या वर्षी 1 विद्यार्थी, दुसऱ्या वर्षी 14, आता शेकडो विद्यार्थी आहेत
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यीनींनी केले तर आभार संचालिका लक्ष्मी जाधव यांनी मानले.