जामखेडमध्ये तिसऱ्या आघाडीच्या हालचाली शहरांसह तालुक्यातील विविध प्रश्नांवर पाच आँगस्ट रोजी बैठक

0
331

जामखेड न्युज ——-

जामखेडमध्ये तिसऱ्या आघाडीच्या हालचाली

शहरांसह तालुक्यातील विविध प्रश्नांवर पाच आँगस्ट रोजी बैठक

 

शहर तसेच तालुक्यातील विविध प्रश्नांविषयी आवाज उठविण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस, युवक काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, प्रहार, रासपा, आम आदमी पार्टी, स्वाभीमानी शेतकरी संघटना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), मनसे अशा समविचारी पक्षांना एकत्रित करून महायुती. व महाविकास आघाडीला तगडा पर्याय देण्यासाठी पाच आँगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

यामुळे आगामी काळात येणाऱ्या जामखेड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था च्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका याची निवडणूक विषयावर समविचारी पक्ष व संघटना ची जामखेड तालुका व शहरातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी

तसेच तालुका मधील विविध शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्यांक, अपंग, महिला, शिक्षण, आरोग्य, रस्ता,पाणी शेतकऱ्यांचा चे कर्ज माफी चा प्रश्न कल्याणकारी योजना, भटके विमुक्त आदिवासी दलित इतर प्रश्न वर चर्चा करण्यात येणार,या बैठकीसाठी विविध पक्ष व संघटनांचे प्रमुख पदाधिकार्या उपस्थित बैठक आयोजित केली आहे.

1)शहाजी राजेभोसले तालुकाध्यक्ष काँग्रेस
2) राहुल उगले, प्रदेश सचिव युवक काँग्रेस,,
3) वंचित बहुजन आघाडी=अँड डॉ अरुण जाधव,
आतिश पारवे
4) प्रहार=नयुम भाई शेख , जयसिंग उगले
5)रासपा=विकास मासाळ, डॉ प्रकाश कारंडे
6) आम आदमी पार्टी -संतोष नवलाखा
7) स्वाभिमानी शेतकरी संघटना=सुनिल लोंढे
8) अँड. मयूर डोके तालुका शिवसेना तालुकाप्रमुख
9) प्रदीप टापरे, दादा (हवा) सरनोबत

वरील सर्व जबाबदार तालुका व जिल्हा, राज्य पदाधिकारी आहेत, सखोल चर्चा करुन पुढील रणनिती आखली जाईल.विनंती वेळेवर उपस्थित राहणे हि नम्र विनंती.

बैठक तारीख=5 ऑगस्ट 2025 वार= मंगळवार वेळ सायंकाळी 05:00 वाजता. बैठकीचे स्थळ= ओम साई हॉटेल नगर रोड जामखेड जिल्हा अहिल्यानगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here