आदर्श मुख्याध्यापक रमेश अडसूळ तर गुणवंत अध्यापक म्हणून येवले वसुंधरा यांची निवड
गणित प्रज्ञा प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांचा सत्कार
अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने जामखेड तालुक्यातील श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हाळगावचे मुख्याध्यापक रमेश अडसूळ यांना आदर्श मुख्याध्यापक तर नवीन मराठी शाळेच्या गणित अध्यापिका येवले वसुंधरा यांची गुणवंत अध्यापक म्हणून निवड करण्यात आली. तसेच दोघांचाही सत्कार करण्यात आला.
अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचा राज्यस्तरीय प्रज्ञापात्र विद्यार्थी तसेच गुणवंत गणित अध्यापक आणि आदर्श मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पार पडला.
या कार्यक्रमासाठी गणित संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब इथापे, जिल्हा गणित प्रतिनिधी भरत लहाने, मुख्याध्यापक रमेश अडसूळ, कार्यकारणी सदस्य शिवाजी गायकवाड, श्रीमती वसुंधरा येवले, पांडुरंग वराट, नागनाथ शिंदे व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये 2024-25 साठी आदर्श मुख्याध्यापक म्हणून श्री अडसूळ रमेश मारुती मुख्याध्यापक श्री.भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हळगाव यांना मिळाला तसेच गुणवंत गणित अध्यापिका म्हणून श्रीमती येवले वसुंधरा सुदाम यांना सन्मानित करण्यात आले.
दोघांचेही तालुका गणित संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय प्रज्ञा पात्र विद्यार्थी म्हणून नवीन प्राथमिक मराठी शाळा ,जामखेड मधील खालील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
शिष्यवृत्ती व पदक प्राप्त विद्यार्थी (गोल्डन कॅटेगिरी) यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामधून चि. झेंडे आर्यन अशोक हा प्रथम आला.
तसेच गणित प्रज्ञा प्रमाणपत्र धारक विद्यार्थी (सिल्वर कॅटेगिरी) मधून खालील विद्यार्थी पात्र ठरले १)राऊत शिवम नवनाथ २)भिडे श्रेयस अनंत ३)गायकवाड प्रेम आकाश ४)जसाभाटी आयुष योगेश ५)वराट कृष्णा पांडुरंग ६)कु. म्हेत्रे विजयालक्ष्मी निलेश ७)कु. पोटे आरती शरद ८)कु. अष्टेकर सृष्टी वैभव ९)कु. रोडे दुर्वाश्री गणेश
या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी श्रीमती येवले वसुंधरा सुदाम आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना राळेभात यांनी खूप परिश्रम घेतले.सर्व यशस्वी विद्यार्थी आणि श्रीमती येवले मॅडम आणि मुख्याध्यापिका श्रीमती राळेभात मॅडम यांचे तालुका गणित संघटनेच्या वतीने खूप खूप अभिनंदन.