जामखेडमध्ये कृषी सेवा केंद्र फोडले, पावणेतीन लाख रुपयांची बियाणे व औषधे चोरीला
जामखेड शहरातील बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळा नंबर आठ मधिल कुमटकर ॲग्रो एजन्सी या खताचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी पावने तीन लाख रुपयांची खते बियाणे व औषधे चोरुन नेले. या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यान विरोधात जामखेड गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी बाबासाहेब बापु कुमटकर रा. राजेवाडी ता. जामखेड यांचे जामखेड शहरातील बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळा नंबर आठ मध्ये बी – बियाने, खते व औषधाचे कुमटकर ॲग्रो एजन्सी या नावाने दुकान आहे.
दि 30 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास या बीडरोड वरील खताच्या दुकानाचे तीन अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटले व आत प्रवेश केला.
यानंतर या चोरट्यांनी खताच्या दुकानातील 1 लाख 36 हजार रुपये किमतीच्या कांद्याच्या बियाणांच्या एकुण तीन पेट्या व 1 लाख 52 हजार रुपयांच्या औषधांच्या बाटल्या असा एकुण 2 लाख 88 हजार रुपयांचे बीयाने व औषधे आज्ञात तीन चोरट्यांनी चोरुन नेले.
याप्रकरणी कुमटकर ॲग्रो एजन्सी चे मालक यांनी दि 31 जुलै रोजी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे हे करत आहेत.